TRENDING

Pune : पीएमसी सफाई कामगारांचा अनोखा जुगाड! हात न लावता करताहेत स्वच्छता, VIDEO होतोय व्हायरल

Pune Viral Video : प्रत्येक शहरात अनेक स्वच्छता कामगार आहे जे शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावतात. सफाई कामगारांमुळेच प्रत्येक घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. महानगरपालिकांच्या मदतीने आज घरोघरी कचरा वाहून नेणारी गाडी येते, लोक आपल्या घरातील ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा गोळा करतात आणि कचरा वाहून नेणाऱ्या गाडीमध्ये टाकते. लोकांनी गाडीमध्ये कचरा नीट टाकावा, म्हणून सफाई कामगार काम करतात. सध्या असाच एक पुण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सफाई कामगार हात न लावता सफाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video pmc Safai Kamgar jugaad video goes viral they clean garbage without touch the hand) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कचरा वाहून नेणारी गाडी दिसेल या गाडीशेजारी तुम्हाला काही सफाई कामगार दिसेल. हे सफाई कामगार हात न लावता सगळी सफाई करणार. पीएमसी कामगारांचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. दोन सफाई कामगार हात न लावता एका कापड्याच्या मदतीने कचरा गाडीमध्ये टाकताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय,”पीएमसी कामगारांचा नाद नाही, हात न लावता सगळी सफाई करणार.” हेही वाचा : Video :”फास्टफूडसमोर चटणी भाकरी ठरली सरस!”, ७५ वर्षाच्या आजी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पटकावला तृतीय क्रमांक A post shared by ek_Puneri || Travel ?|| Foodie || PUNE ? (@ek_puneri) ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” काम करायचं पण रुबाबात ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सिंहगड रोड चे सेवक लय हुशार आहे” तर एका युजरने लिहिलेय, “पीएमसीचे कामगार माणूस नाहीत का त्यांना कुठल्या गोष्टीची घाण वाटू शकत नाही का ? किळस येऊ शकत नाही का? त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केलेली इथं दिसून येत नाहीये . ना हँडग्लोज आहेत ना मास्क दिसतोय न शूज .. काहीच प्रोव्हाइड करत नसतील तर अशा प्रकारचे जुगाडच करायला लागणार ना त्यांना..” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात स्मार्टवर्क” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.