TRENDING

Dahi Handi 2024 : दहीहंडीचा असा थरार फक्त कोकणातच! ४० फूट खोल विहिरीत नेमकी कशी फोडतात हंडी, एकदा पाहाच Video

Konkan Dahi Handi Viral Video : जन्माष्टमीचा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्टला म्हणजे मंगळवारी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या दहीहंडी सणाला स्पर्धात्मक खेळाचं रुप प्राप्त झालंय. गोविंदा पथकांमध्ये उंचच उंच मानवी मनोरे रचून या मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी चढाओढ सुरू असते. पण, महाराष्ट्रातच कोकणात असे एक गाव आहे, जिथे दहीहंडीचा एक अनोखा थरार पाहायला मिळतो. इथे दहीहंडी मानवी मनोरे रचून नाही तर चक्क ४० फूट खोल विहीर हंडी फोडली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल? ही कोणती परंपरा… जर तुम्हीही कधी विहिरीत उडी मारून दहीहंडी फोडण्याचा थरार पाहिला नसेल तर खालील व्हिडीओ एकदा पाहाच… व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, अनेक तरुण विहिरीच्या काठावर बसून जोरात ओरडत आहेत. दुसरीकडे ढोलताशांचा गजर सुरू आहे. यावेळी एक तरुण विहिरीच्या काठावरील तरुणांच्या खांद्यावर उभा राहतो आणि ४० फूट खोल विहिरीच्या मधोमध बांधलेली हंडी उडी मारून फोडण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे एक एक करून सर्व तरुण ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्याचा असा थरारक खेळ पाहून उपस्थित लोकही जल्लोष करतात. कोकणातील थरारक आणि अनोख्या दहीहंडीचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. Read More News On Dahi Handi 2024 : दहीहंडी सण का साजरा केला जातो? मुंबईत हा सण कशा प्रकारे साजरा होतो? घ्या जाणून A post shared by मराठी तथ्य by Saurabh Khandagale (@knowledge_marathi) दरम्यान, कोकणातील हा थरारक दहीहंडीचा खेळ अलिबागमधील कुर्डूस देऊआळी गावात खेळला जातो. इथे शेकडो तरुण एकत्र जमून हा थरारक दहीहंडीचा अनुभव घेतात. तुडुंब भरलेल्या विहिराच्या काठावरून सुमारे १० फूट उंचीवरून उडी मारून ही दहीहंडी फोडली जाते. तुम्ही आजवर उंच उंच मानवी मनोरे रचून लाखो, करोडोंच्या बक्षिसांची लयलूट करणारा दहीहंडी उत्सव पाहिला असेल, पण या गावातील परंपरा अगदी निराळी आहे. येथे सुमारे ४० फूट खोल विहिरीच्या मधोमध सुमारे १५ फूट उंचावर दहीहंडी बांधली जाते. यानंतर तुडुंब भरलेल्या विहिरीच्या मधोमध लटकलेली हंडी फोडण्यासाठी एका तरुणाला खांद्यावर घेऊन त्याला हंडीच्या दिशेने फेकण्यात येते. तरुणाचा हात हंडीला लागला तर एकच जल्लोष केला जातो. अनेक तरुण विहिरीत उड्या मारत नाचत आपला आनंद व्यक्त करतात, अशी ही थरारक दहीहंडी आता अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. हेही वाचा- Dahi Handi 2024: गोविंदा रे गोपाळा! मुंबईतील ‘या’आहेत प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या, नक्की भेट द्या कोकणातील थरारक दहीहंडीचा हा व्हिडीओ knowledge_marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेक लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, कोकण आणि कोकणची संस्कृती खूप छान अगळी वेगळी पाहायला मिळते…, तसेच अनेकांनी कोकणातील ही दहीहंडी पाहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी अशा जीवघेण्या पद्धतीने दहीहंडी फोडणे चुकीचे असल्याचे म्हणत व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.