TRENDING

….यामुळे अपघात घडतात! एक चूक महागात पडू शकते, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

Viral Video : सध्या सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात तर काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात. अनेकदा एका लहान चुकीमुळे अपघाताला सामोरे जावे लागते त्यामुळे वाहन चालवताना सतर्क राहणे, खूप गरजेचे आहे नाहीतर अपघात घडू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीची एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते, हे दाखवले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. (Road accident video a reason why accidents happen due to a single mistake you can lost your life) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्ता ओलांडताना तो माहे बघतो तेव्हा त्याला वाहने येताना दिसतात तरीसुद्धा तो न घाबरता रस्ता ओलांडण्यास निघतो. तेव्हा दुचाकीस्वार आणि एका कार एकमेकांना धडक देणार म्हणून कार लगेच ब्रेक मारते त्यानंतर कारमागे वेगाने आलेला ट्रक सुद्धा ब्रेक मारतो आणि थांबतो. कारचालकाने किंवा ट्रकचालकाने वेळीच ब्रेक मारला नसता तर दुचाकीस्वाराचा मोठा अपघात झाला असता. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “या अशा बिनडोक लोकांमुळेच अपघात होतात.” हेही वाचा : Video :”फास्टफूडसमोर चटणी भाकरी ठरली सरस!”, ७५ वर्षाच्या आजी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पटकावला तृतीय क्रमांक A post shared by अहिरानी मीमर ?? (@ahirani.memer) हेही वाचा : मुंबईतील डेटिंग घोटाळा उघड! पुरुषांना भेटण्यास बोलावून घातला हजारो रुपयांना गंडा; काय आहे नेमकं प्रकरण? ahirani.memer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उगाच कोणा मुळे कोणाचा जीव जातो.” तर एका युजरने लिहिलेय, “टाटाच्या गाड्यांमधील तंत्रज्ञान आणि ड्रायव्हर्सच्या समयसुचकतेमुळे अपघात टळला! मोटरसायकलस्वारसारख्या बेजबाबदार लोकांमुळे अपघात घडतात, त्यांना चांगला चोप दिला पाहिजे!!” आणखी एका युजरने लिहिलेय,”कोणताही ड्रायव्हर चुकीचा नसतो हे यावरून सिद्ध झाले ट्रक कंट्रोल केला भावाने” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून दुचाकीचालकावर संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी असेच अनेक घटनांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्या व्हिडीओमध्ये लहान चूका जीवावर बेतू शकतात, हे दाखविले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.