TRENDING

मुंबईतील डेटिंग घोटाळा उघड! पुरुषांना भेटण्यास बोलावून घातला हजारो रुपयांना गंडा; काय आहे नेमकं प्रकरण?

डेटिंग ॲप्स आजकालच्या पिढीसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. डेटिंग अ‍ॅप्स हे नवीन लोकांना भेटण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे जो जोडीदार शोधण्यासाठी मदत करतो. डेटिंग अ‍ॅपद्वारे तरुण-तरुणींची एकमेकांबरोबर ओळख होते, आवडी-निवडी जुळल्या की गोष्ट पुढे जाते. चॅटिंग होते त्यानंतर ते एकमेकांना भेटतात आणि मग डेटिंग सुरु होते. ही झाली डेटिंग अ‍ॅप्सची चांगली बाजू पण त्यांची आणखी एक भितीदायक बाजू आहे, ते म्हणजे डेटिंगच्या नावाखाली होणारी फसवणूक. नुकतेच वकील आणि सामाजिक कार्यकर्ती असेलेल्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी अलीकडेच अशाच एका घोटाळ्याबद्दल सांगितले. डेटिंगच्या नावाखाली आतापर्यंत १२ जणांची फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले. “मुंबई डेटिंग घोटाळा उघड! द गॉडफादर क्लब अंधेरी वेस्ट. निर्लज्जपणे रोज फसवणूक केली जात आहे. आतापर्यंत १२ जणांची फसवणूक झाली आहे. टिंडर, बंबलच्या माध्यमातून हा सापळा रचला जात आहे. बिलाची रक्कम २३ हजार ते ६१ हजारपर्यंत असते. एकाच मुलीने केली ३ पुरुषांची फसवणूक,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. हेही वाचा स्वारगेट बसस्थानक की बस तळे! पावसामुळे पाहा कशी झाली अवस्था, Video होतोय व्हायरल भारद्वारज यांनी काही बिलांचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये काही पुरुषांनी रेस्टॉरंटमध्ये किती पैसे दिले ते दिसते, त्यात एक बिल ६१,७४३ रुपयांचे आहे. बिलामध्ये प्रत्येकी ₹ ५००० किंमतीच्या दोन कॉकटेलसह चार वस्तू दाखवल्या आहेत. या पोस्टला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ? MUMBAI DATING SCAM EXPOSE ? THE GODFATHER CLUB ANDHERI WEST ◾BRAZEN SCAMMING EVERYDAY ◾12 victims in touch ◾Trap laid through Tinder, Bumble ◾Bill amounts 23K- 61K ◾3 men trapped by same girl @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mymalishka @CMOMaharashtra @zomato pic.twitter.com/qGOacFCE9f “हा घोटाळा कसा? लोक स्वतः मुलीला प्रभावित करण्यासाठी पैसे देत आहेतय ती ऑर्डर देत असताना त्या व्यक्तीला कोण पैसे देणार हे स्पष्ट करण्याचा किंवा थेट सांगण्याचा पर्याय आहे की, “मला २ पेक्षा जास्त पेये परवडत नाहीत.” पण मग ते पुरुषत्व आणि शौर्य हिरावून घेते. काहीतरी परत मिळवण्याच्या प्रयत्नात व्यक्ती A व्यक्ती B ला भेटते. व्यक्ती B त्यांच्या तर्कसंगत विचारांचा फायदा घेत नाही. लोक तुम्हाला मूर्ख बनवत नाहीत, तुम्ही आधीच मुर्ख आहात आणि लोक त्याचा फायदा घेतात,” असे एका एक्स वापरकर्त्याने लिहिले. “माझा मित्रही इथे फसला. आशा आहे की, पोलीस रेस्टॉरंटवर काही कारवाई करतील,” आणखी एकाने लिहिले. तिसरा म्हणाला, “मी फसवणूक झालेल्या मित्राला ओळखतो. असंच घडतंय, कदाचित तीच जागा आणि समजा तीच मुलगी किंवा दुसरी कोणी असेल. पण हे संपूर्ण मुंबईत, संपूर्ण भारतात घडत आहे.” हेही वाचा – “आई ही आई असते!” मुलगा जिंकल्यानंतर धावत स्टेजवर गेली अन् मारली मिठी, Viral Videoमध्ये बघा आईला झालेला आनंद MODUS OPERANDI : ◾Dating app connect ◾Push for quick meet ◾Meeting place Pizza Express or Metro ◾Then insists Godfather ◾Orders drink, hookah, fireshot ◾Guy isn't shown menu card ◾Bill in thousands within hour ◾She absconds ◾Bouncers corner guy to beat if not paid pic.twitter.com/FhKP26yVUc भारद्वाजने या स्कॅम कसा केला जातो याबाबत सांगितले आहे. डेटिंग ॲप द्वारे ओळख करतात. लगेच भेटण्यासाठी बोलवताता. भेटीचे ठिकाण पिझ्झा एक्सप्रेस किंवा मेट्रो. मग गॉडफादरमध्ये जाण्याचा आग्रह धरला जातो. ऑर्डर ड्रिंक, हुक्का आणि फायर शॉट ऑर्डर कतात. त्या व्यक्तीला मेनू कार्ड दाखवले जात नाही. तासाभरात हजारोंचे बिल येते. मुलगी फरार. पैसे न दिल्यास बाउंसर कॉर्नरमध्ये असलेला व्यक्ती मारहान करतो.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.