TRENDING

काकूंनी वॉशिंग मशीनशिवाय काही सेकंदांत सुकवले कपडे; जुगाडसाठी मॉप बकेटचा केला ‘असा’ वापर; भन्नाट VIDEO व्हायरल

Desi Jugaad Video : आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही. प्रत्येक गल्लीबोळात तुम्हाला एक-दोन तरी असे नमुने आढळतील, ज्यांनी जुगाड करून काहीतरी युनिक गोष्ट तयार केली आहे. मग तो विटांपासून बनवलेला कूलर असो वा भंगार सामानातून गाडी. अनेकदा असे जुगाडाचे व्हिडीओ पाहून खूप आश्चर्य वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच एक जुगाड व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका काकूंनी वॉशिंग मशीनशिवाय अगदी काही सेकंदांत कपडे सुकवलेत. काकूंचा कपडे सुकवण्याचा हा जुगाड पाहून आता युजर्सही चकित झाले आहेत. नेमके काकूंनी काय केले ते पाहू… तुम्हा सर्वांना मॉप बकेट माहिती असेलच. या मॉप बकेटचा वापर घरातील फरशी पुसण्यासाठी केला जातो. फरशी पुसल्यानंतर ते मॉप त्या बकेटमध्ये टाकून स्वच्छ करता येते आणि मग ते खराब पाणी फेकून देता येते. या मॉप बकेटच्या मदतीने कमी वेळात आणि कमी मेहनतीत फरशी अगदी चकाचक करता येते. पण, याच मॉप बकेटचा वापर काकूंनी चक्क कपडे सुकवण्यासाठी केला आहे. आहे ना भन्नाट जुगाड. कोणी विचारही केला नसेल की, मॉप बकेटचा असाही वापर होऊ शकतो. वाशिंग मशीन खराब हो जाये तो….कपड़ा सुखाने का नया तरीका?? pic.twitter.com/pfCsHA2wxA व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काकू बाथरूममध्ये बसून टबमध्ये ठेवलेले कपडे एकेक करून मॉप बकेटमध्ये टाकत आहे आणि ते सुकवून बाहेर काढत आहे. वॉशिंग मशीनशिवाय काही सेकंदांत कपडे सुकवण्याची ही पद्धत आता अनेकांना फार आवडली आहे. India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या कपडे सुकवण्याचा हा भन्नाट जुगाड व्हिडीओ @Arunk750 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘वॉशिंग मशीन खराब झाल्यास, कपडे सुकवण्याची नवीन पद्धत’. हा व्हिडीओ ताआत्तापर्यंत अनेकांनी पाहिला आहे, ज्यावर अनेक जण जबरदस्त कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, मुलींनी या काकूंकडून काहीतरी शिकले पाहिजे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ही खूप भारी आयडिया आहे. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, आपल्या भारतात टॅलेंटची कमतरता नाही. अशा प्रकारे युजर्स कमेंट्स करीत काकूंच्या अनोख्या जुगाडचे कौतुक करीत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.