TRENDING

“पुणेकरांचा नाद नाय” हेल्मेट सक्तीवर पुणेकर महिलेनं दिलं अजब उत्तर; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की

Funny video: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. भारतात ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. तरीही काहीजण वाहतुकीचे नियम मोडतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला म्हणतेय की हेल्मेट सक्ती फक्त पुरुषांनाच हवी स्त्रीयांना नको..आणि यासाठी तिनं जी कारणं सांगितली आहेत, ती ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. पुणे तिथे काय उणे असं म्हंटलं जातं, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल कारण पुण्यातील या महिलेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला म्हणतेय की, “महिलांना हेल्मेट सक्ती करू नये. कारण महिलांच्या मागे खूप व्याप असतात. मुलांची शाळा असते, नवऱ्याचं ऑफिस असतं, घरातील वृद्ध मंडळींची सेवा करावी लागते. अन् या सर्व कामांचा ताण त्यांच्यावर असतो. त्यामुळे त्यांना हेल्मेट सक्ती करू नये. त्या ऐवजी महिलांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील. लाडकी बहिण योजनेचे पैसे कसे वाढवता येतील याकडे सरकारनं लक्ष द्यावं. पुरूषांना हेल्मेटची गरज आहे पण महिलांना हेल्मेटची गरज नाही.” तिनं दिलेलं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ A post shared by जुनं ते सोनं ? (@old_is_gold._.__) हेही वाचा >> “आयुष्यात पैसा, व्यसन…” मुलाला स्वत:चं हृदय देण्याआधी वडिलांचा शेवटचा सल्ला; वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडीओ @AshokBuaddha नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले…”वह स्त्री है, त्यातही ती पुण्यातली” तर आणखी एकानं म्हंटलंय “या ताईंचा लगेच सत्कार झालाच पाहिजे.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.