TRENDING

मुलांच्या भांडणात पडली महिला, चिमुकल्यासह आईच्याही मारली कानाखाली, Video Viral

लहान मुलांची अनेकदा छोट्या मोठ्या कारणांवरून भांडणे होत असतात पण अशा वेळी मोठ्या लोकांना त्यांना समजावणे अपेक्षित असते. मुलांना पालकांनी मुलांना शांतपणे त्यांची चूक सांगणे आणि माफी मागून भांडण मिटवले पाहिजे. पण प्रत्यक्षात असे काहीच घडत नाही. उलट लहान मुलांच्या भांडणामध्ये मोठे लोकही पडतात आणि भांडणे करतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आहे जी लहान मुलांच्या भांडणात मध्ये पडते आणि दादागिरी करत सर्वांशी भांडत आहे. उत्तर प्रदेशातील दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. मुलांच्या भांडणात आधी आई देखील एकमेकांशी भांडू लागल्या. एका महिलेने चिमुकल्याच्या कानाखाली मागवली आणि यानंतर त्या महिलेने त्या मुलाच्या आईलाही कानाखाली मारली . मुलाची महिलेचे वर्तनाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आरोपी महिला अत्यंत असभ्य पद्धतीने ओरडताना दिसत आहे. मारहाणीला बळी पडलेल्या महिलेने या घटनेची तक्रार नोएडा पोलि‍सांकडे केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. हेही वाचा – Baba Vanga Predictions 2025 : २०२५मध्ये जगावर भूकंपाचे संकट, भारतावर प्रभाव होणार? बाबा वेगाचं काळजाचं थरकाप उडवणार भाकीत In Noida's Gaur City 2, a woman slapped a 6-year-old child and then resorted to verbal abuse. The child's father has filed a complaint at Bisrakh police station. pic.twitter.com/pXJHpyZrVx या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी महिला ओरडत आहे की, ‘तो जिथे मला एकटा दिसले तिथे मी त्याला कानाखाली मारेन.’ या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणारी दुसर्‍या मुलाची आई महिलेला विचारते की, ‘ आधी मला सांग की तू माझ्या मुलाला का मारले?’, हा प्रश्न ऐकून आरोपी महिलेने रागाच्या भरात महिलेवर हल्ला करते आणि तिलाही कानाखाली मारते. त्यामुळे तिचा फोन खाली पडतो. दुसर्‍या व्हिडिओमध्ये ती महिला व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या इतर लोकांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. तिला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसह ती दिसत आहे. हेही वाचा – “हे लोक पुण्याचे नाव खराब करतात” कात्रज चौकात बांधकाम सुरू असलेल्या पुलावर तरुणांचे फोटोशूट, Video Viral पाहून संतापले पुणेकर नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. तक्रारीत महिलेने मुलाला थप्पड मारल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपी महिलेची चौकशी करून कारवाई केली जाईल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.