Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती, प्राचीन वास्तू आणि मंदिरे, ऐतिहासिक इमारती या शहराची ओळख सांगतात. पुणेरी लोक, पुणेरी भाषा, पुणेरी पाट्या एवढंच काय तर पुण्यातील अनेक गोष्टी लोकप्रिय आहे. पुण्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पीएमटी बस सुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरते. दरदिवशी पुण्यात हजारो लोक पीएमटीने प्रवास करतात. पीएमटीमधील गमती जमती, भांडणं, मजेशीर किंवा कधी कधी थक्क करणाऱ्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पीएमटी बसमध्ये ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. तुम्ही ऑनलाईन तिकिट काढता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Pune Video never throw pmt bus online ticket video viral showing upi id and mobile number seems on the ticket) हेही वाचा : “लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे” या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पीएमटीचे एक ऑनलाईन तिकिट दाखवले आहे. वडगाव बु. ते एसएनडिटी कॉलेज पर्यंतचे तिकिट आहे. प्रवासीने १५ रुपयांचे ऑनलाईन तिकिट काढले आहे. पण तुम्हाला माहितीये का जेव्हा आपण पीएमटीचे ऑनलाईन तिकिट काढतो तेव्हा तिकिटावर तुमचा युपीआय आयडी दिसतो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला तिकिटावर युपीआय आयडी दिसते. हे तिकिट जर तुम्ही फेकले तर कोणीही तुमच्या युपीआय आयडीचा चुकीचा वापर करून तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “सावधान.. सावधान पीएमपीएमएल चे ऑनलाईन तिकिट काढत असाल तर सावधान. ऑनलाईन तिकिट काढल्यामुळे तुमचा युपीआय आयडी प्रिंट होत आहे आणि युपीआयआडीमध्ये तुमचा मोबाईल नंबर सुद्धा दिसत आहे. त्यामुळे आपले तिकिट कुठेही फेकू नका.” A post shared by पुणे Browser (@pune_browser) हेही वाचा : “काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क pune_browser या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहचवा…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी महत्वाची माहिती” तर एका युजरने लिहिलेय, “बरं झालं माहिती दिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्या पेक्षा डिजिटल तिकिट काढा अॅप वरून” None
Popular Tags:
Share This Post:

‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.