Shocking video: सोशल मीडियावर दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. तर, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. मंदिरात चोरी झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आलेल्या आहेत. मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटनाही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. या संदर्भातील अनेक व्हिडीओही व्हायरल झाले समोर आलेले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये चक्क पुजाऱ्यानेच चोरी केली आहे. या पुजाऱ्यांची चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमधील अंजनेया स्वामी मंदिर या ठिकाणी ही घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मंदिरातील दान पेटीत जमा झालेल्या पैशांच्या मोजणीचं काम सुरू आहे. दरम्यान एक व्यक्ती नोटांचं बंडल आपल्या खिशात ठेवतो आणि गुपचूप निघून जातो. ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल एकच नाही तर तिघं जण यामध्ये सामील आहेत. तसेच यांची चोरीची पद्धत पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पाहा व्हिडीओ बेंगलुरु के एक मंदिर में कर्मचारियों द्वारा दान की गई राशि चुराने की एक हालिया क्लिप ने भक्तों में आक्रोश पैदा कर दिया है pic.twitter.com/gwVoKu0Juy हेही वाचा >> “म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची? सोशल मीडियावर हा व्हिडीओ @AshokBuaddha नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले… “व्वा, काय चोर आहेत, पुजारी फक्त नावाला आहेत.” तर दुसरा म्हणतो, “हे काय चाललंय आपल्या देशात, अरे देवाला तरी घाबरा”. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
‘पहला तेरे नैन मैं देखे…’ गाण्यावर चिमुकली करतेय भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
TRENDING
- by Sarkai Info
- December 19, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.