TRENDING

पावसात वेगाने बाईक चालवणाऱ्यांनो हा Video पाहाच; तुमची छोटीशी चूक कशी ठरू शकते जीवघेणी

Horrifying Bike Accident Viral Video : सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशा पावसात ओल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे मोठे कसरतीचे पावसामुळे निसरडे झालेले रस्ते, त्यात खड्डे, ट्रॅफिक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अपघातांची शक्यता अधिक असते. त्यामुळे लोकांना पावसात विशेषत: बाईक न चालविण्याचा सल्ला दिला जातो आणि बाईक चालवायचीच असेल, तर वेगमर्यादा कमी ठेवण्यास सांगितले जाते. परंतु, अनेकदा लोक अशा काही चुका करतात की ज्यामुळे त्यांचे नुकसान होण्यासह जीवही धोक्यात येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाईकस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो पावसात बाईक चालविताना कशा प्रकारे एका भीषण अपघातातून वाचतो हे दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईकस्वार महामार्गावरून अतिशय वेगाने बाईक चालवत होता. त्यावेळी पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता आणि त्यामुळे तो बाईकसह जोरात रस्त्यावर कोसळला. तो रस्त्याच्या अगदी मधोमध अतिशय जोरात खाली पडला आणि घसरत थोडा पुढे गेला. याचदरम्यान त्याच्यामागून एक भरधाव ट्रक येता होता. कावळा बसण्याची आणि फांदी तुटण्याची जशी एकच वेळ येते, त्याचप्रमाणे बाईकस्वार रस्त्यावर कोसळायला आणि ट्रक त्याच्यामागून यायला अशी एकच वेळ होणार होती; पण सुदैवाने बाईकस्वार जीव तोडून धावला आणि रस्त्याच्या कडेला गेला. अशा प्रकारे त्याचे दैव बलवत्तर असल्यामुळे त्याचा जीव वाचला. बाईकस्वाराने डोक्यावर हेल्मेट घालत्याने त्याला कोणताही गंभीर दुखापत झाली नाही; पण त्याच्या बाईकचे नुकसान झाले. हा अपघात पावसात वेगाची बेभान नसेमुळे निष्काळजीपणे बाईक चालविल्यामुळे झालेला आहे. मात्र, हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे ते स्पष्ट झालेले नाही. A post shared by K❤️S (@kanchanfeelings) पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. @kamchanfeelings नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अशा प्रकारे वेगाने बाईक चालवणाऱ्यांचा मला खूप राग येतो. दुसऱ्या एका युजरने सवाल केला की, निष्काळजीपणे बाईक चालवण्याची काय गरज होती आणि तेही रस्त्याच्या अगदी मधोमध? यमराज सुटीवर गेला वाटते? तिसऱ्या एका युजरने लिहिले की, हा तर एका चित्रपटातील सीन वाटतोय. चौथ्या एका युजरने लिहिले की, त्याने आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगले काम केले असेल म्हणून त्याचा जीव वाचला. अशा प्रकारे काही युजर्स बाईकस्वारावर जोरदार टीका करत आहेत; तर काही जण रस्त्यावरून बाईक चालवताना सावकाश चालवा, असा सल्ला देत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.