ST Bus announcement: लाल परी म्हणजेच सगळ्यांची आवडती एसटी बस. या एसटीचा प्रवास अनेकांना आवडतो. बहुधा गावी जाण्यासाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी लोक एसटी बसनं प्रवास करतात. एसटी आगारामध्ये बसची वाट बघत असताना आपण अनेकदा त्यांची अनाउन्समेंट ऐकलीच असेल. ही अनाउन्समेंट कंप्यूटर जनरेटेड असते. बस डेपोशिवाय अशी अनाउन्समेंट आपल्याला कुठेच ऐकायला मिळत नाही. पण अशीच हुबेहुब अनाउन्समेंट करणारा एक छोटा कलाकार सध्या चर्चेत आहे. या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हेही वाचा… “कुठेही हात लावशील का?”, पुण्यात महिलेने दारुड्याला घडवली जन्माची अद्दल; ‘त्या’ बसमध्ये नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कोल्हापूरच्या वारणानगर येथे आयोजित केलेल्या एका साहित्य सम्मेलनात एका शाळकरी मुलाने आपलं टॅलेंट सादर केलं. स्टेजवर उभं राहून त्याने त्याची आणि त्याच्या शाळेची ओळख करून दिली. त्यानंतर या मुलाने सांगितलं की, “माझ्या काव्याअगोदर मी तुम्हाला एसटी महामंडळाची कंम्प्यूटर अनाउन्समेंट करून दाखवणार आहे.” यानंतर त्याने अगदी हुबेहुब त्याच आवाजात आपली कला सादर केली. A post shared by Marathi epic jokes (@marathi_epic_jokes) या शाळकरी मुलाचं नाव सर्वेश पाटील, असं आहे आणि तो सोशल मीडियावर एसटीशी संबंधित अनेक व्हिडीओ शेअर करीत असतो. हा व्हायरल व्हिडीओ @marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘भाऊने तर ओरिजनलपेक्षा पण जास्त ओरिजनल केलं’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्याला तब्बल तीन मिलियन व्ह्युज आले आहेत. हेही वाचा… लग्नानंतर पहिल्याच रात्री नववधूने केली विचित्र मागणी; नवऱ्याला म्हणाली, “मला बीअर, गांजा आणि…” शाळकरी मुलाचा हा टॅलेंट पाहून अनेकांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप छान, प्रत्येक मुलगा अभ्यासातच हुशार हव असं काही नाही. प्रत्येक मुलगा हा त्याला मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रातच यशस्वी होतो आणि हा मुलगा भविष्यात ‘मिमिक्री आर्टिस्ट’ नक्की होणार अशी” तर दुसऱ्याने “भावाला आयुष्यभरासाठी एसटी बस प्रवास मोफत करा”अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हा मुलगा उत्तम डबिंग आर्टिस्ट होईल.” “भावा एकच नंबर”, “तुझ करिअर सेट आहे”, “जबरदस्त”, “सेम टू सेम” अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत. None
Popular Tags:
Share This Post:

‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.