TRENDING

लग्नानंतर पहिल्याच रात्री नववधूने केली विचित्र मागणी; नवऱ्याला म्हणाली, “मला बीअर, गांजा आणि…”

Bride asks beer ganja: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अनेक विधी परंपरा पार पाडून लग्नसोहळा संपन्न होतो. आपल्या घरात येणारी आपली बायको समजूतदार असली पाहिजे, तिने कठीण प्रसंगात आपली साथ दिली पाहिजे अशा सामान्य अपेक्षा तर सगळ्यांच्याच असतात. नवीन घरात पाऊल ठेवणारी नववधूदेखील सगळं सांभाळून घेते. पण, लग्न झाल्या झाल्या जर पहिल्याच दिवशी एखाद्या नवरीनं आपल्या नवऱ्याकडून नशा करण्यासाठी गांजा आणि दारू मागितली तर… हे वाचून जितका धक्का तुम्हाला बसलाय, तितकंच धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये घडलंय. हेही वाचा… ‘या’ कृतीची तिला किंमत मोजावी लागली, जेवण करताना वापरत होती फोन अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं… FPJच्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमध्ये नवविवाहितेने पहिल्याच रात्री आपल्या पतीकडे बीअर, गांजा आणि बकऱ्याचे मटण मागितल्याची घटना घडली. या घटनेने नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. नववधूने ‘मुँह दिखाई’ विधी आणि ‘सुहाग रात’च्या वेळी या सगळ्याची मागणी केली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. खरं तर जेव्हा नववधूने नवऱ्याकडे बीअर मागितली तेव्हा तो तिच्यासाठी बीअर आणायला तयारदेखील झाला होता; पण जेव्हा तिने गांजा आणि बकऱ्याचं मटण मागितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. हे कळताच नवऱ्यानं लगेच त्याच्या कुटुंबीयांना ही धक्कादायक बाब सांगितली. हेही वाचा… सीएनजी भरताना कर्मचाऱ्याने डोळाच गमावला! पुण्यात घडली धक्कादायक घटना, पाहा थरकाप उडवणारा VIDEO नववधूची पहिल्याच रात्री बीअर, गांजा व बकऱ्याचं मटण खाण्याची इच्छा आहे, असं समजल्यावर कुटुंबीयांनी नववधूला जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. नववधूनं अचानक नशा करण्याची मागणी केली हे काही वराच्या घरच्यांना पटलं नाही आणि हे प्रकरण पोलिसांकडे गेलं. सुहाग रात आणि मुँह दिखाईच्या वेळी नववधूने ज्या काही मागण्या केल्या, त्याबद्दल वराच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर दोन्ही पक्षांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी, विशेषत वराच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदविण्याचा विचार मागे घेतला. मात्र, नवऱ्याच्या कुटुंबीयांनी वधू महिला नसून तृतीयपंथी असल्याचा गंभीर दावा केला. पोलीस ठाण्यामध्ये सुरुवातीला मतभेद झाल्यानंतर कौटुंबिक प्रकरण घरी सोडविता येईल, या विचाराने वर आणि वधूचे कुटुंबीय पोलीस ठाण्यामधून निघाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.