TRENDING

VIDEO: दागिने घातले, हाराने सजवले अन् केकऐवजी ठेवलं हे समोर; सोंड हलवत धन्यवाद म्हणणाऱ्या ‘हत्ती अखिला’च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहा

Viral Video Of Celebrating Elephant 22nd Birthday: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. तो दिवस केक, आवडीचे पदार्थ, नवनवीन कपडे, चेहऱ्यावर आनंद आणि अशा बऱ्याच काही गोष्टींमुळे त्याच्यासाठी अपूर्वाईचा असतो. आता तर अनेक जण श्वान, मांजर या प्राण्यांचेही केक कापून वाढदिवस साजरे केले जातात. पण, तुम्ही कधी हत्तीचा वाढदिवस साजरा केला जात असताना पाहिलं आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर काही नागरिकांनी मिळून हत्तीचा वाढिवस साजरा केला आहे. हत्ती या प्राण्याच्या वाढदिवसासाठी काय खास केलं आहे ते व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ… व्हायरल झालेला हा व्हिडीओ तमिळनाडूचा आहे. वाढदिवसानिमित्त हत्तीला फॅन्सी दागिने व हारांनी सजवण्यात आलं आहे. हत्तीसमोर केक नाही तर द्राक्षे, टरबूज, डाळिंब, गाजर आदी अनेक फळांनी भरलेली दोन ताटे ठेवलेली दिसत आहेत. हत्ती आपल्या सोडेंद्वारे या फळांचा आस्वाद घेताना दिसत आहे. तसेच यादरम्यान आजूबाजूचे नागरिक हत्तीसाठी हॅपी बर्थडे हे गाणे गाताना दिसत आहेत. हे ऐकून हत्ती आनंदाने आपली सोंड हलवतो आहे. भारतीय नागरिकांनी साजरा केलेला हत्तीचा वाढदिवस तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा. हेही वाचा… हातात चहाचा कप अन् ‘त्याचा’ मजेशीर शिंकण्याचा आवाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू; नेटकरी म्हणाले, ‘टॉम आणि जेरी…’ व्हिडीओ नक्की बघा… The elephant is called Akhila and its 22nd birthday was celebrated in a temple in the Indian state of Tamil Nadu. As elephants are very clever, you can clearly tell it was quite happy with the celebration and was happily enjoying the fruits it was being fed. pic.twitter.com/xk8zMZeFKq व्हायरल व्हिडीओतील हत्तीचे नाव अखिला, असे आहे. हा त्याचा २२ वा वाढदिवस असतो. हा खास वाढदिवस भारताच्या तमिळनाडू राज्यातील एका मंदिरात साजरा करण्यात आला. हत्ती खूप बुद्धिमान असतात, असे म्हटले जाते. आपल्यासाठी काही माणसे मिळून खास सेलिब्रेशन करीत आहेत हे बहुतेक हत्तीला कळले असावे आणि त्यामुळे तो खूप आनंदित झाला आहे आणि त्याला खाऊ घातलेल्या फळांचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओबरोबर ‘भारतात हत्तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला’ असा मजकूर देण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नागरिक “हॅपी बर्थडे” हे गाणे म्हणत असताना हत्ती सोंड हलवून त्यांना धन्यवाद म्हणताना दिसत आहे. हत्तीचा मंदिराबाहेर बसलेला फोटो, वाढदिवस म्हणून केकऐवजी फळ खातानाचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालादेखील नक्कीच आनंद वाटेल याबाबत शंका नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.