TRENDING

“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूपदेखील आपल्याला पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मगरीला अतिहाव करणं अंगलट आलंय. झालं असं की मगरीनं यावेळी एका उडणाऱ्या ड्रोनची शिकार केली. पण तो ड्रोन मगरीच्या जबड्यात जाताच त्यामधील बॅटरी फुटली आणि एक मोठा ब्लास्ट झाला. अन् त्यानंतर पुढे मगरीचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ड्रोन आकाशात उडतो आणि दूरवरून व्हिडिओ-फोटो कॅप्चर करू शकतो, ते सहजपणे एक मोठे क्षेत्र व्यापू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, वाइड अँगलसाठी हा एक उत्तम पर्याय आहे . ड्रोन आकाशात उडत असले तरी जमिनीवर उभे राहून ते दूरस्थपणे नियंत्रित केले जाते. असाच जंगलातील दृश्य कॅमेरात कैद करण्यासाठी हा ड्रोन जंगलात सोडण्यात आला होता. यावेळी मगरीनं चक्क त्यावरच हल्ला करत अक्षरश: तो तोंडात धरला आणि नंतर त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. आता व्हिडीओ पाहून तुम्हीच नक्की चूक कुणाची? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलातील एका तलावाजवळ हा ड्रोन कॅमेरा आला असून तो त्याठिकाणच दृश्य रेकॉर्ड करत आहे. यावेळी एक मगर बराच वेळ त्या ड्रोनवर नजर ठेवून होती. कदाचीत त्या मगरीला तो ड्रोन म्हणजे एखादा पक्षी असल्याचं वाटलं असेल. कारण जेव्हा तो ड्रोन बरोबर मगरीच्या डोक्यावर येऊन उभा राहिला, तेवढ्यात मगरीनं त्या ड्रोनवर झडप मारली. आणि एका फटक्यात त्याचा फडशा पाडला. पण हीच बाजी पलटली आणि त्या ट्रोनची बॅटरी चावताच ती फुटली आणि मगरीच्या तोंडात एक मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टनंतर मगरीला चांगलीच दुखापत झाली. आणि ती वेदनेनं विव्हळली. तुम्ही मगरीच्या तोंडातून निघणारा धूर पाहू शकता. पाहा व्हिडीओ A post shared by Khichdi Shorts (@khichdishorts) हेही वाचा >> “लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे” सोशल मीडियावर हा व्हिडीओ khichdishorts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, प्राण्यांच्या घरात असली उपकरणं सोडतातच का? तर आणखी एकानं मगरीला दोष देत म्हणून जास्त हाव करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.