TRENDING

VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी लहान मुले डान्स करताना दिसतात तर कधी लहान मुले गाणी गाताना दिसतात. कधी कधी लहान मुलांबरोबर घातलेला गोड संवादाचा व्हिडीओ चर्चेत येतो. तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सार्वजानिक कार्यक्रमात एक तरुणी जी अँकर आहे ती चिमुकल्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. ती एका चिमुकलीला असा प्रश्न विचारते की उत्तर न देताच चिमुकली चक्क रडायला लागते. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a child girl cried as young girl asked questions to her funny viral video on social media) हेही वाचा : “हे लोक पुण्याचे नाव खराब करतात” कात्रज चौकात बांधकाम सुरू असलेल्या पुलावर तरुणांचे फोटोशूट, Video Viral पाहून संतापले पुणेकर या व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्या मुली स्टेजवर उभ्या असलेल्या दिसत आहे आणि अँकर त्यातील एका चिमुकलीला प्रश्न विचारते. अँकर मजेशीरपणे विचारते, “तुझं लग्न झालंय का?” प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला सुरुवात करते. चिमुकलीला रडताना पाहून तरुणी म्हणते, “अगं बाई बाई… कुणाचं हाय हे..” चिमुकलीला रडताना पाहून सर्वजण जोरजोराने हसताना दिसतात. सध्या हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Watch Viral Video) anchor_monika_jaju या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुफान के पहले आने वाली शांती.. “अय्या दीदी मला काय पण विचारतेय जा.. बाबा” हेही वाचा : संभलमधील जातीय हिंसाचारावेळी जामा मशिदीत झाली तोडफोड? व्हायरल Video चा त्रिपुराशी काय संबंध ? खरं काय ते पाहा या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दिदी हे काय विचारताय” तर एका युजरने लिहिलेय, “डायरेक्ट काळजावर अटॅक” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी असे अनेक लहान मुलांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.