TRENDING

‘ती’ त्याच्या मांडीवर बसली अन्…, चालत्या गाडीमध्ये कपलचा रोमान्स, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

Couple romance in running car: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं असं अनेकांना वाटत असतं. प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल चक्क धावत्या कारमध्ये लज्जास्पद कृत्य करताना दिसत आहेत. हेही वाचा… आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की, या कपलने मर्यादा ओलांडत धावत्या कारमध्ये लाजिरवाणं कृत्य केलं आहे. नागपूरात धरमपेठ येथे तरुण कार चालवताना दिसत आहे. ड्रायव्हरच्या सीटवर असलेल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर तरुणी बसली आहे. कार चालवता चालवता दोघं किस करताना दिसतायत. यामुळे भयंकर अपघातही होऊ शकतो याची जाणीव त्यांना दिसत नाहीय. A post shared by vidarbhakar ? (@vidarbh.kida) सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vidarbh.kida या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत ड्रायविंग सीटवर बसून अश्लील चाळे” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल २.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत. हेही वाचा… कोल्हापूरात टॅलेंटची कमी नाही! शालेय विद्यार्थ्याने केली एसटी महामंडळाची अनाउन्समेंट; आवाज ऐकून बस डेपोमध्ये आल्यासारखं वाटेल, पाहा VIDEO सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सीट बेल्ट कसा लावला असेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तिला मोशन सिकनेस असेल म्हणून घाबरून बसली असेल” तर तिसऱ्याने “तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे” अशी कमेंट केली. तर “यांनी लाज सोडलीय”, “असं कराल तर अपघात होईल” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.