TRENDING

अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. दर दिवशी हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओत तुम्हाला असे काही दिसेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला चक्क दुसऱ्याच्या घरातील कुंडीसह फुलाचे झाड चोरताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला स्कुटी चालवत येते आणि एका घरासमोर थांबते. त्यानंतर महिला स्कुटीवरून उतरते आणि घरासमोर ठेवलेली फुलाच्या झाडाची कुंडी उचलते आणि स्कुटीवर ठेवते आणि तिथून निघून जाते. ही महिला भर दिवसा कुंडीसह फुलाचे रोपटे चोरताना दिसते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : कोल्हापूरात टॅलेंटची कमी नाही! शालेय विद्यार्थ्याने केली एसटी महामंडळाची अनाउन्समेंट; आवाज ऐकून बस डेपोमध्ये आल्यासारखं वाटेल, पाहा VIDEO A Lady On Scooter Got Caught stealing Flowers pots in Broad Day-Light pic.twitter.com/CKj4ax7cRE gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भरदिवसा स्कुटीवरून एक महिला फुलांची कुंडी चोरताना कॅमेऱ्यात कैद झाली.” हेही वाचा : “लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फुलांची कुंडी सुद्धा चोरतात लोकं!” तर एका युजरने लिहिलेय, “फुलाची कुंडीमध्ये असे काय आहे की चोरावे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “ती स्त्री आहे ती काहीही करू शकते” एक युजर लिहितो, “हा नवीन ट्रेंड आहे” तर एक युजर लिहितो, “कसे लोक आहेत, फुलाची कुंडी सुद्धा सोडत नाही” आणखी एक युजर लिहितो, “ती वृक्ष प्रिय व्यक्ती आहे” यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये लोक रंगेहाथ चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.