TRENDING

महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

Shocking video: प्रत्येकाला गरमागरम चपत्या खाव्याशा वाटतात, जेणेकरून घरातील सदस्यांचे पोट चांगले भरावे आणि प्रत्येकजण मनसोक्त खाऊ शकेल. त्यामुळे अनेक गृहिणी फक्त गरमागरम चपात्या बनवतात. तसेच, मळलेले पीठ शिल्लक असता ते रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केले जाते. जेणेकरून ते खराब होणार नाही आणि पुन्हा चपात्या बनवण्यासाठी वापरता येईल. तुम्हीही असंच करत असाल तर सावधान. गव्हाचे मळलेले पीठ रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी त्याचं काय होतं हे पाहिलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. जर तुम्ही पीठ प्लॅस्टिक किंवा भांड्यात ठेऊन फक्त ताट झाकून ठेवले तर ही पद्धत अत्यंत चुकीची मानली जाते. कारण रेफ्रिजरेटरच्या तापमानात पीठ उघडे ठेवणे हानिकारक आहे. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने संपूर्ण रात्र फ्रिजमध्ये गव्हाचं मळलेलं पीठ ठेवलं. त्यानंतर सकाळी मायक्रोस्कोपमध्ये हे पीठ ठेवल्यानंतर जे दिसलं ते धक्कादायक होतं. या व्हिडीओमध्ये तुम्हीच पाहा किती किटाणू या पिठामध्ये दिसत आहेत. हेच किटाणू आपल्या पोटात जातात आणि आपण आजारी पडतो. ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाहा व्हिडीओ A post shared by World Marathi (@world_marathi_) हेही वाचा >> स्कूटी चोरायला गेला आणि काहीतरी भलतंच केलं; VIDEO पाहून सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख? इतकेच काय तर या चपात्या आरोग्यासाठी नुकसानाकारण असतात. अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. तर अशा परिस्थिती नेमकं काय करायचं हे गृहिणींना समजत नाही त्यांचा गोंधळ उडतो. मग राहिलेल्या कणकेचं काय करायचं? असा प्रश्न पडतो. तर मळलेल पीठ तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एअर टाईट कंटनेर लागेल. एअर टाईट कंटनेरमध्ये पीठ खराब होत नाही आणि या पीठाच्या चपात्यादेखील चांगल्या होतात. तसेच, आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पीठ ७ ते ८ तासांच्या आत वापरा. यामुळं कणिक काळीदेखील पडणार नाही. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.