TRENDING

“कुठेही हात लावशील का?”, पुण्यात महिलेने दारुड्याला घडवली जन्माची अद्दल; ‘त्या’ बसमध्ये नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

Pune Women slaps a man for molesting video viral: महिलांचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या असे संस्कार लहानपणीच अनेकांवर होतात. पण, वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारावरून काही लोक त्यांचे हे संस्कार विसरले आहेत असं दिसतंय. काही विकृत लोकं भान विसरून आपली मर्यादा ओलांडतात आणि कुठेही कधीही महिलांची छेड काढतात. त्यातही दारूडे लोक जो मुर्दाडपणा करतात तो तर काही विचारूच नका. सध्या असाच एक घृणास्पद प्रकार पुण्यात घडला आहे. पण, छेड काढली म्हणून शांत न बसता, महिलेने त्या विकृत माणसाला चांगलीच अद्दल घडवली आहे. सोशल मीडियावर पुण्यातील हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका बसमध्ये एक महिला पुरूषाला मारताना दिसतेय. त्याचं झालं असं की, बसमध्ये एक महिला प्रवासी आपल्या लहान मुलासह प्रवास करत असताना एका पुरूषाने तिची छेड काढली. छेड काढताच महिलेने रुद्रावतार धारण केला आणि त्या पुरूषाला चांगलाच धडा शिकवला. महिलेने बसमध्येच त्या विकृत माणसाला मारायला सुरूवात केली. त्याची कॉलर पकडून महिलेने त्याला कानशि‍लात लगावली. एका मिनिटात २१ वेळा कानाखाली मारत महिलेने त्याला जाब विचारला. हेही वाचा… मला बीअर, गांजा आणि…, पहिल्याच रात्री नववधूने नवऱ्याकडे केली विचित्र मागणी; लग्नानंतर खरा चेहरा आला समोर, नेमकं प्रकरण काय? व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, महिला त्या नराधमाला कानाखाली मारत “माझ्या अंगावर हात टाकतोस. तू दारू प्यायला आहेस, म्हणून कुठेही हात लावशील का? आई वडिलांनी हे वळण लावलं.” असा जाब विचारताना दिसली. तर यावर उत्तर देत तो पुरूष फक्त सॉरी म्हणत माफी मागत होता. तसंच “सॉरी ताई मी वाईट काहीनाही केलं. मी जरा धुंदीमध्ये होतो” असंही तो म्हणाला. A post shared by महिलेने बसमध्ये सगळ्यांसमोर त्याला जाब विचारला पण यादरम्यान, कंडक्टरने कोणतंच पाऊल उचललं नाही म्हणून महिला कंडक्टरवरदेखील संतापली. यानंतर कंडक्टरनेही त्या पुरूषाला कानशि‍लात लगावली आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली. हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत जावं यासाठी महिलेने कंडक्टर आणि ड्रायव्हरला गाडी पोलीस स्टेशनला न्यायला सांगितली. हेही वाचा… ‘या’ कृतीची तिला किंमत मोजावी लागली, जेवण करताना वापरत होती फोन अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं… ही धक्कादायक घटना पुणे येथील पीएमटी बसमध्ये घडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “एकदम बरोबर ताई, असंच बडवलं पाहिजे.” दुसऱ्याने, “चुकी असेल तर ठीक आहे. पोलिसांच्या ताब्यात द्या; पण कंडक्टरने लाथा घातल्या, ते कितपत योग्य आहे,” असा प्रश्न विचारणारी कमेंट केली. तिसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “प्रत्येक मुलीने हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहायला हवा.” “अशी वाघीण प्रत्येक घरात जन्माला येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना”, “हाच पर्याय आहे. त्याशिवाय महिलांवर होणारे अन्याय थांबणार नाहीत”, “बायकांसाठी वेगळी बस ठेवा कायमची” अशादेखील कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.