TRENDING

ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा

Viral Video Shows Girl Stuck Under A Rubble : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ (Viral Video ) सापडला. व्हिडीओत एक चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकली आहे, असा दावा करत हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ गाझा पट्टीतील आहे असासुद्धा दावा करण्यात आला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, हा व्हिडीओ गाझा पट्टीतील नाही आणि हा व्हिडीओ चिमुकलीच्या वडिलांनी काढला होता. एक्स (ट्विटर) युजर नदीम अहमदने त्याच्या @IamNadeem_A या प्रोफाईलवरून व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ढिगाऱ्याखाली अडकलेली पॅलेस्टिनीची चिमुकली मदतीची वाट पाहत आहे; किती हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आहे, पण आंतरराष्ट्रीय समुदाय यावर गप्प आहे’. मलबे के नीचे दबा एक फिलिस्तीनी बच्चा मदद का इंतज़ार कर रहा है कितना हृदयविदारक दृश्य है, लेकिन अंतरराष्ट्रीय समुदाय इस पर मौन है ?? pic.twitter.com/vLjlOM6AOj मलबे के नीचे दबा एक फिलिस्तीनी बच्चा मदद का इंतज़ार कर रहा है कितना हृदयविदारक दृश्य है, लेकिन अंतरराष्ट्रीय समुदाय इस पर मौन है ?? pic.twitter.com/OJQjRCECPl ?मलबे के नीचे दबा एक फिलिस्तीनी बच्चा मदद का इंतज़ार कर रहा है कितना हृदय विदारक दृश्य है, लेकिन अंतरराष्ट्रीय समुदाय इस पर चुप है ??? pic.twitter.com/xVi5E0C09v मलबे के नीचे दबा एक फिलिस्तीनी बच्चा मदद का इंतज़ार कर रहा है कितना हृदयविदारक दृश्य है, लेकिन अंतरराष्ट्रीय समुदाय इस पर मौन है ?? कभी कभी लगता हैं की काश दुनिया मजहब के बिना होती तो नफरत भी नही होती #Gaza_life_matters #palermowuhan @aajtak #protest pic.twitter.com/UoQyBsFG9y हेही वाचा… VIRAL VIDEO : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही टूलमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवरून शोध सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला अरबीमध्ये एक लेख सापडला, ज्यामध्ये मुलीचा स्क्रीनशॉट होता. दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या लेखात म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी सीरियाची आहे, गाझा पट्टीतील नाही. तसेच ती खेळत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, चिमुकलीच्या वडिलांनी सीरियातील त्यांच्या घरी स्वच्छ कपड्यांमध्ये खेळताना आणि मजा करताना लहान मुलीचे फोटो, व्हिडीओदेखील पोस्ट केले आहेत. या व्हिडीओला १,७२,००० लाइक्स आणि २८,००० शेअर्स मिळाले आहेत. या अकाउंटला १५ हजार लोक फॉलो करतात. आम्हाला शोरूक न्यूजच्या अधिकृत हँडलवर एक फेसबुक पोस्टदेखील सापडली. वडिलांनी सोशल मीडिया युजर्सना तिचा व्हिडीओ शेअर करू नका, असे आवाहनही केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेली चिमुकली गाझा पट्टीतील असल्याचा दावा केला जात आहे, पण ती प्रत्यक्षात सीरियाची आहे. मुलगी खेळत असताना तिच्या वडिलांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. चिमुकली घरी सुरक्षित आहे आणि व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.