Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. बऱ्याचदा काही लोकांना प्रचंड मेहनत करूनही एखाद्या कामात यश मिळत नाही. दुसरीकडे, त्यापेक्षा कमी मेहनतीत काही लोक यशस्वी होतात. अशावेळी त्या व्यक्तीचं नशीब चांगलं आहे असं आपण सहज बोलून जातो. मात्र असं खरंच असतं का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पाहून मेहनतीसोबत नशीब पण किती महत्त्वाचं आहे हे कळेल. सोबतच जिंकण्याआधी कधीच विजय साजरा करु नये असं का म्हंटलं जातं हे सुद्धा हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, याठिकाणी धावण्याची स्पर्धा सुरु आहे आणि स्पर्धक जिंकण्यासाठी जिवाच्या आकांताने धावत आहेत. यावेळी स्पर्धा जिंकण्यासाठी अवघं दोन पावलांचं अंतर राहिलेलं असताना हा खेळाडू त्याच्या जिंकण्याचा विजय साजरा करतो. म्हणजे यावेळी त्याचा धावण्याचा वेग थोडा कमी होतो आणि तो इकडे तिकडे बघत हळू हळू धावतो. तेवढ्यात मागून येणारा स्पर्धक अचानक विजेच्या वेगाने त्याच्या बाजूने पुढे निघू जात स्पर्धा जिंकतो. पहिल्या आलेल्या स्पर्धाकाला जिंकण्याआधीच विजय साजरा करणं चांगलंच महागात पडलं असून तो स्पर्धा हरतो. सगळ्यांच्या पुढे आणि पहिला आलेला स्पर्धक थोडंसं दुर्लक्ष झाल्यानं रिबीनच्या अवघ्या काही अंतरावर असताना त्याचा डाव हुकतो. यावेळी एका चुकीमुळे त्याची सगळी मेहनत वाया जाते आणि तो हरतो. “हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखं या खेळाडूसोबत घडलं आहे. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल. आयुष्यात एका सेकंदाची किंमत काय विचारणाऱ्यांना हा व्हिडीओ बघून कळेल की आयुष्यात एका सेकंदाची किंमत किती आहे.. हा खेळाडू जर पुढे गेला असता तर कदाचित तो स्पर्धा जिंकला असता. पाहा व्हिडीओ A post shared by Attitude Marathi Dialogue (@attitude_marathi_dialogue_007) हेही वाचा >> PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल सोशल मीडियावर maharashtra_remix_reel नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आज समजलं मेहनतीसोबत नशीब पण महत्त्वाचे असतं” तर आणखी एकानं याच प्रतिक्रियेला रिप्लाय देत “नशिबापुढे मेहनतीचंही नाही चाललं” अशी प्रतिक्रिया दिली आहे. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
‘पहला तेरे नैन मैं देखे…’ गाण्यावर चिमुकली करतेय भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
TRENDING
- by Sarkai Info
- December 19, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.