TRENDING

धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी अडवताच म्हणाला…, पाहा VIDEO

Jodhapur Ward Boy Viral Video : राजस्थानमधील जोधपूरमधल्या रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉर्डबॉयने चक्क एका रुग्णाची ECG चाचणी केली आहे. टेक्निशियन दिवाळीच्या रजेवर होता तसेच रुग्णालयात एकही डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी वॉर्डबॉयने यूट्यूब व्हिडीओ पाहून रुग्णाची ECG चाचणी केली. यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांनी वार्डबॉयचा ईसीजी तपासतानाचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. गुरुवारी (३१ ऑक्टोबर) जोधपूरच्या सॅटेलाइट रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी पोहोचला असताना ही घटना घडली. व्हिडीओ समोर आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. जोधा यांनी, चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. या घटनेशी संबंधित दोन वेगवेगळे व्हिडीओ समोर आले आहेत. एक व्हिडीओ रुग्णाने स्वत: आणि दुसरा त्याच्याबरोबर असलेल्या कुटुंबीयांनी बनवला होता. हा व्हिडीओ दिवाळीच्या दिवसांतील आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण रुग्णालयामध्ये खाटेवर झोपलेला दिसत आहे. तो वॉर्डबॉय लॅब टेक्निशियन दिवाळीला रजेवर असल्याचे सांगतोय. त्याला मशीन कसे हाताळायचे ते माहीत नाही? त्यानंतर पहिला व्हिडीओ पूर्ण होतो. दुसऱ्या व्हिडीओमध्ये रुग्णाचे कुटुंबीय म्हणतात की, भाऊ, तू म्हणतोस की, तू कधीच ईसीजी केलेला नाहीस. मग रुग्णाच्या जीवाशी का खेळत आहेस? घरातील सदस्य त्याला वारंवार सांगतात की, भाऊ, कुणाला तरी फोन करा, ईसीजीचा हृदयाशी थेट संबंध आहे. काही झाले तर? त्यावर वॉर्डबॉय म्हणतो की, मी लॅब टेक्निशियन नाही आणि तो दिवाळीच्या रजेवर घरी गेला आहे. मला काही करायचे नाही. सर्व काही योग्य ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जे काही काम होईल ते मशीन करील. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य जोधा यांनी सांगितले की, हा व्हिडीओ शुक्रवारी समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. जोधपुर के सरकारी पावटा जिला अस्पताल में यूट्यूब वीडियो देखकर मरीज की ECG करने का वीडियो वायरल @ABPNews @ashokgehlot51 @BhajanlalBjp @BJP4Rajasthan @hanumanbeniwal @INCIndia @GajendraKhimsar @RajCMO @RajCMO #rajasthan #jodhpur #ECG #Doctors pic.twitter.com/j3moB72EPB ‘ जोधा यांनी सांगितले की, चुकीचे ईसीजी पॉइंट्स लावले गेल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. पॉईंट योग्य ठिकाणी न लावल्यास अहवाल योग्य प्रकारे येत नाही. मग अशा परिस्थितीत योग्य उपचार करणे शक्य होत नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.