TRENDING

माणुसकीला सलाम! तिचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वत:चा जीव धोक्यात टाकला; पुढच्याच क्षणी ट्रेन आली अन…थरारक VIDEO

Viral video of woman attempting suicide: गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात आत्महत्येबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला रेल्वेसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसते. पण, तिचा हा प्रयत्न एका माणसामुळे अयशस्वी ठरला. नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या. हेही वाचा… चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओत रेल्वेस्थानकावर नेहमीसारखी गर्दी दिसत आहे. तेवढ्यात अचानक प्लॅटफॉर्मवर उभी असलेली एक महिला रुळाजवळ धावत जाते आणि त्याच क्षणी तिथून ट्रेन येत असते. आत्महत्या करण्याच्या विचारात असलेली ही महिला धावत जाताना लगेच मागून एक माणूस धावत जातो आणि तिचा हात पकडून तिला मागे खेचतो. हे करताना त्या माणसाला थोडी दुखापतही होते; पण तो त्या महिलेचा हात मात्र सोडत नाही. हे दृश्य पाहून रेल्वेस्थानकावर जमलेले सगळे लोक सतर्क होतात आणि त्या महिलेकडे धावत जातात. A post shared by sudeep (@mr_perfect_actor_kiccha) हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ @heart_touchinghub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. हेही वाचा… VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “तिला वाचवताना भावाच्या डोक्याला जबर मार लागला.” दुसऱ्याने, “खरा हीरो,” अशी कमेंट केली. “आयुष्य फुकट मिळतं का?”, अशी कमेंटही एकाने केली. दरम्यान, याआधीही अशा अनेक घटना रेल्वेस्थानकाजवळ घडल्या आहेत; जिथे अनेकांनी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा घटनांमध्ये अनेकांचा जीव वाचतो; तर काही जण आपलं आयुष्य गमावून बसतात. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.