TRENDING

बापरे! भल्यामोठ्या फणाधारी किंग कोब्राचे तरुणाने घेतले चुंबन, तितक्यात घडले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

King Cobra Shocking Video : सापाचे नाव ऐकले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सरपटणारा हा प्राणी कुठेही जाऊन राहू शकतो. त्यामुळे मनुष्याला त्याच्यापासून अधिक धोका असल्याने हा प्राणी दिसला तरी त्याला हात लावणे तर दूरच; पण त्याच्याजवळ जाण्याचीही कोणी हिंमत करत नाही. काही प्राणीप्रेमींना साप आवडत असले तरी अनेकांना हा एक भयानक प्राणी वाटतो. कारण- जहाल विषारी सापाच्या एका दंशानेही माणसाचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. सध्या सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या किंग कोब्राचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. त्यात एक तरुण चक्क त्याचे चुंबन घेतोय. पण, त्यानंतर तो नाग असं काही करतो की, ते पाहून तुम्हालाही घाम फुटेल. अनेकांना व्हिडीओतील दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा भयावह व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल होतोय. व्हिडीओत एका भल्यामोठ्या किंग कोब्राचे एक तरुण चुंबन घेताना दिसत आहे. त्यानंतर किंग कोब्रा फणा काढून तरुणाच्या दिशेने झडप घालतो आणि पुढे जे काही घडते, ते पाहून तुमच्याही अंगावर भीतीने काटा येईल. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण भल्यामोठ्या किंग कोब्राला हळूच पकडण्याचा प्रयत्न करत असतो. पण, तो किंग कोब्रा इतका मोठा आहे की, त्याच्यासमोर अजगरदेखील थिटा ठरेल. असे असतानाही तो तरुण धाडस करून त्या किंग कोब्राला पुन्हा मागून हळूच पकडण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी तो किंग कोब्रा वारंवार त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो तरुण मागे न हटता, प्रयत्नपूर्वक त्याला शांत करतो आणि मागून किंग कोब्राचे चुंबन घेतो; पण किंग कोब्राला स्पर्श झाल्याचे समजताच तो फणा काढून पटकन मागे फिरून, त्याच्यावर हल्ला करण्यासाठी झेप घेतो. त्यावेळी अतिशय चपळ असलेला तो तरुणा किंग कोब्राला हातात पकडतो आणि गळ्यात अडकवतो. इतकेच नाही, तर तो यावेळी किंग कोब्राला हवेत उचलून धरतो. हे थराराक दृश्य पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. पण, या झटापटीत हा तरुण सापाबरोबर थरारक प्रकार करत असतो. एकदा किंग कोब्रा जंगलात पळून जाण्याचाही प्रयत्न करतो; पण तो तरुण त्याला पुन्हा पकडून ओढत बाहेर रस्त्यावर आणतो. भरगच्च ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट न मिळाल्याने तरुणाचा ढासू जुगाड, दोरीचा केला असा वापर; VIDEO एकदा पाहाच View this post on Instagram A post shared by Mike Holston (@therealtarzann) हा धक्कादायक व्हिडीओ @therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हे सामान्य नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, रिअल टारझन. अशा प्रकारे युजर्स तरुणाचे हे कृत्य फार भयानक असल्याचे म्हणत आहेत. तर काही युजर्स त्या तरुणाचे कौतक करीत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.