TRENDING

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

Viral video: जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या वाघानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं… सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. जंगालात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो. त्यामुळे वाघ आणि सिंह दोघेही खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. वाघ आणि सिंहाच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात आणि प्राण्यांच्याही मनात भिती असते. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघाने चित्तथरारक अशी उडी घेतली आहे. या व्हिडीओत वाघाने दहा फूट उंच उडी मारल्याचं स्पष्ट दिसतंय, व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असल्याने वाघाने मारलेली उडी ही चित्तथरारक आहे. कधी कधी आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता आपल्याला माहिती नसतात कारण आपण कधी हिम्मतच केलेली नसते. मात्र वाघाचा हा व्हिडीओ पाहून अशक्य असं काहीचं नसतं हे सिद्ध होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की शंका घेण्यापेक्षा धाडस दाखवलेलं केव्हाही चांगलं. एकतर त्यामध्ये आपण जिंकू किंवा काहीतरी अनुभव घेऊ. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकानं आयुष्य कसं जगावं हे शिकायला मिळत आहे. पाहा व्हिडीओ Tiger effortlessly jumps across the river with a single leap pic.twitter.com/Q0cu9MT7a1 हेही वाचा >> VIDEO: “मेहनतीसोबत नशीब पण महत्त्वाचं असतं” अवघ्या २ सेकंदात ‘या’ तरुणासोबत जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.