TRENDING

चाळीमध्ये राहण्याची मजाच वेगळी! काकूंची कट्टा गँग अन् दुनियादारी, मैत्रीणीसह केला धमाल डान्स; VIDEO एकदा पाहाच

Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. अनेक जण आवडीने रिल्स बनवतात आणि त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका चाळीतल्या काकूने त्यांच्या मैत्रीणीसह भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ दिवाळीच्या दिवसांमधील आहे. चाळीतील महिलांची दिवाळी पाहून थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही महिला दिसेल. या महिलांनी सुंदर साड्या नेसल्या आहेत. या नटलेल्या महिला दुनियादारी चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओमध्ये एका काकुने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या काकु इतर महिलांना डान्स स्टेप्स सांगत त्यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. काकूंची ही दुनियादारी पाहून कोणीही थक्क होईल. काकूंनी त्यांच्या कट्टा गँगबरोबर केलेला धमाल डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना A post shared by Mansi Gawande (@mansi.gawande.73) या काकूंचे नाव मानसी गायकवाड असून त्यांनी त्यांच्या mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिजीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी कट्टा गँग” हेही वाचा : “हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच u या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुमची खरच छान युनिटी आहे” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “आमच्या चाळीतल्या बायकांना तर एकमेकांच्या चुगल्या करायलाच वेळ पुरत नाही तर असा एकत्र येऊन छान व्हिडिओ कधी बनवतील” आणखी एका युजरने लिहिलेय, “चाळीमध्ये राहण्याची मजाच वेगळी” एक युजर लिहितो, “मला आमच्या चाळीची आठवण आली, हे दिवस परत येत नाहीत” तर एक युजर लिहितो, “जबरदस्त मावशी, मैत्रीशिवाय आयुष्य काही नाही.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.