TRENDING

‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

Leopard attacks Viral Video: प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे. प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे. वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या अंगणात एक श्वान फिरत असून यावेळी एक बिबिट्या तिथे येतो आणि श्वानावर हल्ला करतो. तो श्वानाला खाण्याचा खूप प्रयत्न करतो, पण श्वान त्याला पळवून लावण्यात यशस्वी होतो आणि आपला जीव वाचवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. हेही वाचा: ‘म्हणून स्वभाव खूप महत्वाचा असतो…’ भर रस्त्यात मदतीसाठी बिबट्याची धडपड; लोक फक्त पाहत राहिले; पाहा घटनेचा थरारक VIDEO पाहा व्हिडीओ: A post shared by Todo un Pais (@diario.todounpais) हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @diario.todounpais या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास २७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “अशा वातावरणामध्ये घरातील लहान मुलं कशी खेळतात?” तर आणखी एकाने लिहिलंय की, “साईज सेम, पण ताकत वेगळी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “श्वानाचे नशीब चांगले आहे.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.