TRENDING

Diwali In Pakistan : पाकिस्तानमध्ये कशी साजरी केली जाते दिवाळी? कराचीमधील Video होतोय Viral

Diwali In Pakistan : पाकिस्तानातील कराचीमध्ये दिवाळी सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ‘या’ सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातील लोकांना आकर्षित करत आहे. पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला असला तरी दोन्ही देशांची सांस्कृतिक मुळे आजही जोडलेली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी नागरिक दिवाळी साजरी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर बिलाल हडसनने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. “दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांच्या या कथा मी नेहमी ऐकल्या होत्या पण माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी कधीच पाहिले नाही. म्हणून, मी आणि माझा मित्र एहबाब, काही ईदी पद्धतीचे लिफाफे तयार केले आणि स्वामी नारायण मंदिराकडे निघालो.” असे व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने सांगितले. “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कराची शहरात असे दृश्य पाहिले नव्हते. प्रत्येक कोपऱ्यात फटाके फुटत होते. लोक अनारपासून (पाऊस) पट्टी बॉम्बेपर्यंत सर्व प्रकारचे फटाके फोडत होते. हा खऱ्या अर्थाने दीपोत्सव होता”, असेही तो म्हणाला. हेही वाचा – “हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच A post shared by Bilal Hassan | بلال حسن (@mystapaki) व्हिडिओमध्ये कराचीमधील स्वामी नारायण मंदिराचे वातावरण दाखवले आहेत जिथे दिवाळी साजरी करणाऱ्यांसाठी पाकिस्तानी नागरिकांची गर्दी दिसत आहे. मंदिराची आकर्षक सजावट केल्याचे दिसत आहे आणि सर्वत्र फटाक्यांचा आवाज घुमत आहे. लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह दिवाळी साजरी करत आहेत. “हे कराचीचे सर्वात मोठे मंदिर आणि महानगरातील हिंदू जीवनाचे केंद्र आहे. ही जागा लोकांनी खचाखच भरलेली होती,” तो पुढे म्हणाला. एका परंपरेचा संदर्भ देत हसन म्हणाले की, येथे मिठाई आणि भेट देण्यासाठी पैसे लिफाफ्यात ठेवले जातात, लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. हसनने सांगितले की,”त्याला मिठाई देखील मिळाली आणि त्याने त्याच्या मित्रांना पैसेही दिले.” हेही वाचा – Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या या व्हिडिओला आतापर्यंत २.१ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “विविध संस्कृती एकत्र येऊन सण साजरे करताना पाहणे हृदयस्पर्शी आहे. ” दुसऱ्याने लिहिले की,”दिवाळी सर्वत्र साजरी केली जाते. हे लोकांना एकत्र जोडण्याचे काम करते.” दुसऱ्याने लिहिले की, “कराचीमध्ये दिवाळीचा असा उत्सव पाहणे खरोखर आश्चर्यकारक आहे.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.