Killy Paul’s Dance: बॉलीवूडमधील एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की, त्यातील डायलॉग, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता ‘तेरा घाटा’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल पारंपरिक वेशात नसून पँन्ट आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. यावेळी तो ‘तेरा घाटा’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल खरंच खूप सुंदर डान्स करताना दिसतोय. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि चाळीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: “काय नाचतेय ही…”, ‘ब्राईड तुझी नवरी’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक पाहा व्हिडीओ: A post shared by Kili Paul (@kili_paul) एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर करतोयस डान्स” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुझा डान्स मला आवडला” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स किली” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तुझा स्वॅग वेगळाच आहे”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
‘पहला तेरे नैन मैं देखे…’ गाण्यावर चिमुकली करतेय भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
TRENDING
- by Sarkai Info
- December 19, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.