TRENDING

“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच

नुकताच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई आणि फराळ सर्वांना आठवतो. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीची सफाई. दिवाळी येण्यापूर्वीच घरोघरी सर्व साफसफाई केली जाते. घरातील प्रत्येक सदस्य ही घराच्या कानाकोपऱ्याची सफाई करताना दिसतो. ही साफसफाई काही नवीन गोष्ट आहे पण दिवाळीची सफाईवरील एक गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन तरुणांनी दिवाळीच्या सफाईवर वऱ्हाडी रॅप गायले आहे आणि या गाण्यावर एका चिमुकलीने भन्नाट डान्स देखील केला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. इंस्टाग्रामवर garamkalakar नावाच्या प्रोफाइलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोन तरुणांनी दिवाळीच्या सफाईवरील वऱ्हाडी रॅप तयार केले आहे. हे गाण्याचे तीन भाग त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या गाण्याची चाल ही भुलभुलैय्या चित्रपटाच्या टायटल सॉगसारखी आहे त्यामुळे हे गाणे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हेही वाचा – पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश A post shared by ANCHOR VINOD ? (@garamkalakar) व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघांचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की,”प्रतिम रॅप, भावा” तर दुसऱ्याने लिहिले की, “अप्रतिम भावा, काय डोकं लावलं भावा, खूप मस्त” हेही वाचा – “आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का? सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल होत आहे. अनेक लोक या गाण्यावर व्हिडिओ करून पोस्ट करत आहे. दरम्यान या गाण्यावर एका चिमुकलीने अप्रतिम डान्स आणि अभिनय केला आहे. चिमुकलीचा अभिनय पाहून तुमच्या चेहर्‍यावर नक्की हसू येईल. इंस्टाग्रामवर rowdy_surbhi07 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. A post shared by Surbhi SK (@rowdy_surbhi07) व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, “ताईला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काम सगळे केल्या बदल” दुसऱ्याने कमेटं केली,”हे काहीतरी वेगळं होतं” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.