TRENDING

PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल

Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ही पुणेरी पाटी चक्क एका दवाखान्याच्या बाहेर लावण्यात आली आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पाटीवर पेशंटसाठी अशा सूचना लिहल्या आहेत की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल. आता तुम्ही म्हणाल दवाखान्याच्या बाहेर लावलेल्या या पाटीवर नेमकं लिहलंय तरी काय? सुरुवातीला या पाटीवर पेशंटसाठी सुचना असं लिहलं आहे. त्यानंतर सगळ्या सुचना लिहल्या आहेत. १. उधारी अजिबात नको. पेशंट कमी आले तरी चालतील २. प्रत्येक आजार आमच्याकडे बरा होईल असा काही नियम नाही. मी डॉक्टर आहे, तुमचं कुलदैवत नाही. ३. पेशंटनं लुंगी, बरमुडा घालून दवाखान्यात येऊ नये. आपण चेन्नईमध्ये राहत नाही. ४. इंजेक्शनसाठी मनाची तयारी करुनच यावं. ऐनवेळी आढेवेढे घेऊन आमचा वेळ घालवू नये. – आदेशावरुन पाहा पुणेरी पाटी A post shared by Universe Marathi (@universe_marathi) हेही वाचा >> स्कूटी चोरायला गेला आणि काहीतरी भलतंच केलं; VIDEO पाहून सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख? पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा ‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.