TRENDING

Life Certificate Submission : पेन्शनधारकांनो, ‘या’ तारखेपूर्वी जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा…; ऑफलाइन आणि ऑनलाइन कसे जमा करावे? जाणून घ्या

Jeevan Praman Patra Offline Submission : सर्व पेन्शनधारकांनी पेन्शन मिळणे सुरू ठेवण्यासाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सबमिशन विंड १ नोव्हेंबर रोजी ८० वर्षांखालील लोकांसाठी उघडण्यात आली आहे. सुमारे ६९.७६ लाख केंद्र सरकारचे पेन्शनधारक आहेत. पेन्शनधारकांनी प्रमाणपत्र थेट बँक पोस्ट ऑफिस किंवा इतर नियुक्त ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन देयके बंद केली जातील. हा विषय सध्या चर्चेत असून गुगल ट्रेंड होत आहे. जीवन प्रमाणपत्र ऑफलाइन आणि ऑनलाइन हे जाणून घ्या. पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारक खालील पद्धती वापरून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात: ८० वर्षांखालील व्यक्ती १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्रे सादर करू शकतात. सुपर ज्येष्ठ नागरिकांना ८० व त्याहून अधिक वयाचे)१ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यं त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये, केंद्राने बँकांना ज्येष्ठ पेन्शनधारकांना नोव्हेंबर ऐवजी दरवर्षी १ ऑक्टोबरपासून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले. पेन्शनधारक अंतिम मुदतीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, पुढील महिन्यापासून पेन्शन वितरण थांबवले जाईल. पण जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर देयके पुन्हा सुरू होतील. वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की केंद्राने १ नोव्हेंबर रोजी सुरू केलेल्या विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी १.८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांनी त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ८०० शहरे आणि जिल्ह्यांमध्ये मोहीम पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DoPPW) तिसरे देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) सुरू केले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.