KRIDA

PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ

Pakistan Beat South Africa and Win ODI Series: पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेत कमाल करत मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामने जिंकत निर्भेळ मालिका विजय मिळवला आहे. पाकिस्तानी संघाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सय्यम अयुबच्या शतकाच्या जोरावर ३०८ धावा केल्या. यानंतर आफ्रिकेचा संघ ४२ षटकांत २७१ धावाच करू शकला. हा सामना जिंकून पाकिस्तानी संघाने मालिकाही जिंकली आहे. हेही वाचा – रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सय्यम अयुब सर्वात मोठा हिरो ठरला आहे. त्याने या मालिकेत दोन शतकं झळकावली आणि दोन्ही वेळा पाकिस्तानला विजय मिळवून दिला. तो या मालिकेत सर्वाधिक २३५ धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. सय्यम अयुबची फलंदाजी पाकिस्तानी संघाच्या मालिका विजयात मोठी भूमिका बजावणारी ठरली. पाकिस्तानने सुरूवातीचे दोन्ही वनडे सामने जिंकत मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली होती. पण तिन्ही सामने जिंकत आफ्रिकेला पाकिस्तानने मोठा धक्का दिला आहे. हेही वाचा – IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप करून इतिहास घडवला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आफ्रिकेच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० ने निर्भेळ मालिका विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची हिंदीत उत्तरं आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचा संताप, नेमकं काय घडलं? ? First team to whitewash South Africa in South Africa! ? Special series win ? #SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/QJ7VItDjnw पाकिस्तानकडून या सामन्यात सय्यम अयुबने १०१ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी अर्धशतकी खेळी खेळली. सलमान अली आगाने ४८ धावांचे योगदान दिले. तय्यब ताहिर २८ धावा करण्यात यशस्वी ठरला. या खेळाडूंमुळेच पाकिस्तानी संघ ३०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. सय्यम अयुबने शतकांचा तर अब्दुल्ला शफीकने शून्यावर बाद होण्याचा विक्रम केला आहे. फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. सुफियान मुकीमने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.