KRIDA

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची हिंदीत उत्तरं आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचा संताप, नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजावर ऑस्ट्रेलियातली प्रसारमाध्यमं भडकली आहेत. कारण गुरुवारी मेलबर्न या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजाला जे प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरं त्याने हिंदीत दिली आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी संताप व्यक्त करत आमच्या इंग्रजी प्रश्नांची उत्तरं जडेजाने इंग्रजीत द्यायला नकार दिला असं म्हटलं आहे. रवींद्र जडेजाने जी पत्रकार परिषद घेतली ती झाल्यावर तो परतला. मात्र त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकाराने संताप व्यक्त केला आणि तो म्हणाला, रवींद्र जडेजाने आमच्या इंग्रजी प्रश्नांची उत्तरं इंग्रजी भाषेत दिली नाहीत. भारतीय मीडिया मॅनेजरने त्या पत्रकाराला सांगितलं की आज झालेली पत्रकार परिषद ही खासकरुन भारतीय मीडियासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र ऑस्ट्रेलियन पत्रकाराने ते मान्य केलं नाही. त्याने संताप व्यक्त केल्याने हा वाद निर्माण झाला. रवींद्र जडेजाने हिंदीत उत्तरं दिल्याने वाद निर्णाण झाला. आघाडीच्या फलंदाजांचे योगदान आवश्यक; चौथ्या कसोटीपूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे मत रवींद्र जडेलाला विचारण्यात आलं की अश्विनच्या निवृत्तीनंतर तू एकटा पडला आहेस असं तुला वाटतं का? त्यावर तो म्हणाला, “अश्विन माझा ऑन फिल्ड मेंटॉर होता. आम्ही दोघांनीही अनेक सामने खेळले आहेत. आम्ही सामन्यात काय स्थिती निर्माण होते त्यानुसार पुढची रणनीती ठरवायचो. मला अश्विनची कमतरता भासते आहे. मात्र आता तरुण खेळाडूंकडे संधी आहे. भारतासाठी खेळून ते उत्तम कामगिरी करतील.” अश्विन क्रिकेटमधून संन्यास घेईल हे तुला आधी ठाऊक होतं का? हे विचारलं असता रवींद्र जडेजा म्हणाला, अश्विन क्रिकेटमधून संन्यास घेईल असं वाटलं नव्हतं. मला निर्णय घेण्याआधी त्याने फक्त पाच मिनिटांपूर्वी सांगितलं होतं. चौथ्या कसोटी आघाडीच्या आणि मधल्या फळीकडून ही अपेक्षा पूर्ण केली जाईल अशा आशा बाळगून जडेजा म्हणाला,‘‘एक संघ म्हणून कामगिरी करण्यासाठीदेखील आघाडीच्या फळीची जबाबदारी मोठी असते. जर, प्रत्येकाने फलंदाजीत आपले योगदान दिले, तर धावफलकावर एक चांगली धावसंख्या उभी राहते. तिसऱ्या कसोटी सामन्यात केवळ केएल राहुलला आपली छाप पाडता आली होती. त्याच्याखेरीज एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नव्हता.’’ भारताच्या पडत्या डावात जडेजाची खेळी निर्णायक ठरली. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिलाच सामना खेळताना कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘पहिल्या दोन कसोटीत संधी न मिळणे माझ्यासाठी फायद्याचे ठरले. त्यामुळे मला येथील हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य झाले. सरावात फलंदाजी आणि गोलंदाजी केल्यामुळे कसोटी सामना खेळणे कठीण गेले नाही,’’ असेही जडेजा म्हणाला. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.