KRIDA

Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती

Virat Kohli Anushka Sharma to Leave India Soon: विराट कोहली सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीतील शतकानंतर पुन्हा एकदा विराट खराब फॉर्ममधून जात आहे. पण विराटबाबत आता त्याच्या बालपणीच्या कोचने मोठी अपडेट दिली आहे. कोहली आणि अनुष्का लंडनला शिफ्ट झाल्याची किंवा होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता त्याच्या कोचने विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलं वामिका व अकाय लवकरच भारत देश सोडून जाणार आहेत, अशी माहिती दिली आहे. कोच राजकुमार शर्मा यांनी विराट-अनुष्काच्या लंडनला स्थायिक होण्याच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली नाही, परंतु कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उर्वरित आयुष्य लंडनमध्ये घालवण्याची योजना असल्याचे संकेत दिले. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, “विराट मुलं आणि पत्नी अनुष्का शर्मासह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.” हेही वाचा – R Ashwin: “मला अजिबात पश्चाताप नाही, मी बऱ्याच जणांना…”, अश्विनचे निवृत्तीनंतर पहिलं वक्तव्य, राहत्या घरी पोहोचताच नेमकं काय म्हणाला? कोहली गेल्या काही वर्षांत लंडनमध्ये वारंवार दिसला आहे. १५ फेब्रुवारी रोजी त्याचा मुलगा अकायचा जन्मही याच शहरात झाला. कोहली आणि अनुष्का अकायच्या जन्मानंतर लंडनमध्ये राहत आहेत. कोणत्याही द्विपक्षीय मालिका झाल्या की विराट लंडनला त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी पोहचतो. राजकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “होय, विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे. सध्या, क्रिकेटच्या जबाबदाऱ्यांबरोबरच तो आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत आहे.” हेही वाचा – WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण? विराट आणि त्याचे कुटुंब या वर्षात बहुतांश काळ लंडनमध्ये राहिले. आपल्या मुलाच्या जन्मानंतर, कोहली जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात परतला. मात्र, जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर कोहली पुन्हा लंडनला परतला आणि ऑगस्टपर्यंत तिथेच राहिला. लंडनमध्ये राहण्यामागचे कारण म्हणजे विराट आणि त्याच्या कुटुंबाला तिथे एकांतात वेळ घालवता येतो, असं त्याने एकदा सांगितलं. हेही वाचा – R Ashwin Father on Retirement: “अश्विनचा सातत्याने अपमान होत होता…”, लेकाच्या निवृत्तीबाबत वडिलांचं मोठं वक्तव्य, तडकाफडकी निर्णयामागचं सांगितलं कारण मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकांपूर्वी विराट भारतात परतला तर त्यादरम्यान अनुष्काही तिच्या मुलाखतीसाठी भारतात परतली होती. यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेनंतर कोहली आणि त्याचे कुटुंब भारतातच राहिले. नोव्हेंबरमध्ये त्याने आपल्या जवळच्या लोकांसह वाढदिवसही साजरा केला. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.