KRIDA

PAK vs SA: लाइव्ह सामन्यातच महिलेने स्टेडियममध्ये दिला मुलाला जन्म, आफ्रिका-पाकिस्तान वनडे सामन्यात नेमकं काय घडलं?

PAK vs SA 3rd ODI Match Highlights: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवण्यात आला होता, ज्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत एकतर्फी मालिका जिंकली. या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. खरं तर, सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिला चाहतीने स्टेडियममध्येच मुलाला जन्म दिला. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना क्वचितच घडली आहे. या खास प्रसंगी, दक्षिण आफ्रिका क्रिकेटने देखील सामन्यादरम्यान आई-बाबा झालेल्या जोडप्याचे अभिनंदन केले. तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पाकिस्तानच्या डावात स्टेडियममध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवजात बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी या स्क्रीनवर शेअर करण्यात आली होती. मिस्टर आणि मिसेस राबेंग तुमच्या बाळाच्या जन्मासाठी तुमचे अभिनंदन. या सामन्यादरम्यान राबेंग यांनी वाँडरर्स स्टेडियमच्या मेडिकल सेंटरमध्ये मुलाला जन्म दिला. हेही वाचा – PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ ‼️History made as woman gives birth at Wanderers Cricket Stadium while another couple got engaged during the Pink Day ODI‼️??‍?? The Rabeng’s were assisted by the Medics and gave birth to a baby boy at 17:20 in JHB The Proteas need 309 runs to win and avoid a series whitewash pic.twitter.com/VhAlVPhLtd एका जोडप्याचा प्रपोजल व्हीडिओ पाकिस्तान-आफ्रिका सामन्यादरम्यान मुलाच्या जन्मासह अजून एक खास प्रसंग पाहायला मिळाला. एका चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला मॅचदरम्यान लग्नासाठी प्रपोज केलं, त्यानंतर या व्यक्तीने गुडघ्यावर बसत गर्लफ्रेंडला अंगठी घातली. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेही या जोडप्याचे अभिनंदन केले आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हेही वाचा – IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी Pink Day ODI’s are for proposals? Congratulations to the amazing couple on your engagement, may your marriage last a lifetime and more!✨? #WozaNawe #BePartOfIt #PinkDay #SAvPAK pic.twitter.com/V8wZtdIkn1 तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तान संघाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली होती. त्याचवेळी तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४७ षटकांत ९ गडी गमावून ३०८ धावा केल्या. या मालिकेत सय्यम अयुबने आणखी एक शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. तर, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी अर्धशतकं झळकावली. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ३-० ने वनडे मालिकेत नमवत निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.