R Ashwin Retirement Pakistan Cricketer Make Huge Statement: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विन हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक होता आणि त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली अश्विनच्या निवृत्तीवर धक्कादायक वक्तव्य केले आहे. बासित अली त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “अश्विनने कधी निवृत्ती घ्यायला हवी होती हे तुम्हाला माहित आहे का? सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील केल्यानंतर एकतर त्याने निवृत्ती घ्यायला हवी होती किंवा या पाच कसोटी सामन्यांनंतर त्याने निवृत्ती घ्यायला हवी होती. तीन कसोटी सामन्यांनंतर निवृत्ती घेणं हा चुकीचा निर्णय होता. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनी अश्विनला पाचव्या कसोटीपर्यंत थांबायला पटवून द्यायला हवे होते. दोन कसोटी सामन्यांमध्ये तुझी गरज आहे आणि सिडनीत तुझी गरज भासेल, असे त्याला सांगायला हवे होते.” हेही वाचा – R Ashwin Father on Retirement: “अश्विनचा सातत्याने अपमान होत होता…”, लेकाच्या निवृत्तीबाबत वडिलांचं मोठं वक्तव्य, तडकाफडकी निर्णयामागचं सांगितलं कारण बासित अलीने अश्विनच्या निवृत्तीबाबत बोलताना विराट कोहलीचा उल्लेख करताना पुढे सांगताना म्हणाला, “मी खात्रीने हे सांगू शकतो की जर कोहली संघाचा कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती आणि दोन कसोटी सामन्यांनंतर याची घोषणा करावी यासाठी त्याला तयार केलं असतं. का कारण भारताला सिडनी कसोटीत त्याची गरज होती. जर राहुल द्रविड किंवा रवी शास्त्री भारताचे प्रशिक्षक असते तर याघडीला त्यांनीही अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती.” हेही वाचा – R Ashwin: “मला अजिबात पश्चाताप नाही, मी बऱ्याच जणांना…”, अश्विनचे निवृत्तीनंतर पहिलं वक्तव्य, राहत्या घरी पोहोचताच नेमकं काय म्हणाला? बासित अली पुढे म्हणाला, “रोहित आणि गंभीर अश्विनला निवृत्ती घेण्यापासून थांबावू शकले नाहीत ही खूपच वाईट गोष्ट आहे. त्यांनी अश्विनला समजवायला हवं होतं की, आता निवृत्ती नको घेऊ, पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाला तुझी गरज असणार आहे आणि सिडनीमध्ये तर १०० टक्के तुझी गरज भासेल.” हेही वाचा – R Ashwin: अश्विनचं निवृत्तीनंतर भारतात परतताच जंगी स्वागत, चेन्नईतील घरी पोहोचताच आई-वडिल झाले भावुक; पाहा VIDEO बासित अली पुढे म्हणाले की, “अश्विन मॅच विनर आहे का? नाही, अश्विन हा मालिका विजेता खेळाडू आहे. टी-२० मध्ये कोणी चांगली इनिंग खेळली तर आपण म्हणतो की मॅच विनर आला आहे. सर्वोच्च क्रिकेट म्हणजे लाल चेंडूचं क्रिकेट. हरभजन आहे, अनिल कुंबळे आहे, अश्विन आहे हे खेळाडू मालिका विजेते खेळाडू आहेत.” None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.