Australia Announced Squad for 3rd and 4th Test: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या २ कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला असून त्यात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये (IND vs AUS) ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीसाठी उस्मान ख्वाजाची साथ देणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला निवडकर्त्यांनी शेवटच्या २ सामन्यांसाठी संघातून वगळले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवली जाणार आहे. भारताविरूद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाकडून गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झालेला १९ वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टासचा आगामी २ सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी नॅथन मॅकस्विनीच्या जागी सॅमला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, जो मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. सॅमने गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघासाठी पदार्पण केले, ज्यामध्ये त्याचा उत्कृष्ट फॉर्म देखील दिसून आला. हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात आणखी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे, तो म्हणजे वेगवान गोलंदाज झे रिचर्डसन. झेला तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कांगारू कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. रिचर्डसनने ॲशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना २०२१ मध्ये ॲडलेड मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. दरम्यान, दुखापतग्रस्त गोलंदाज जोश हेझलवूडच्या जागी सीन ॲबॉटचा संघात समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा – R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला Will we see Sam Konstas (currently 19y 79d) added to this list on Boxing Day? #AUSvIND pic.twitter.com/015Cx6uaOX पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उप-कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स केरी, जोश इंग्लिश, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झे रिचर्डसन, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.