KRIDA

Vinod Kambli: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांची माहिती; मोफत उपचार करण्याचा हॉस्पिटलचा निर्णय

Vinod Kambli has clots in brain: भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती २३ डिसेंबरला आली. अचानक कांबळी बेशुद्ध झाल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठिक असली तरी चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण आता त्यांचा मेडिकल अहवाल समोर आल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. विनोद कांबळींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर आता अहवाला समोर आला आहे. या अहवालामध्ये विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी ही माहिती दिली. विनोद कांबळी यांना २१ डिसेंबरला चक्कर आल्याने ठाण्यातील आकृती रूग्णालयात दाखल केले होते. हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती कांबळी यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, मुंबईस्थित माजी भारतीय फलंदाजाने सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना शनिवारी भिवंडी शहरातील काल्हेर परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर देखरेख करणाऱ्या वैद्यकीय पथकाला अनेक तपासण्यांनंतर त्यांच्या मेंदूमध्ये गाठी आढळल्या, अशी माहिती त्रिवेदी यांनी दिली. कांबळी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून मंगळवारी टीम अतिरिक्त वैद्यकीय तपासणी करेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्रिवेदी यांनी असेही सांगितले की रुग्णालयाचे प्रभारी एस सिंग यांनी कांबळीला त्यांच्या वैद्यकीय सुविधेत आजीवन मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद कांबळी हे एका दशकाहून अधिक काळ आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम १९९६ च्या विश्वचषक संघाचा सदस्य असलेले ५२ वर्षीय कांबळी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या कारकिर्दीत आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक संघर्षांमध्ये अडकले आहेत. कांबळी अलीकडेच त्यांच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभात दिसले. यादरम्यान बालपणीचा मित्र आणि भारताचा माजी सहकारी सचिन तेंडुलकरला कार्यक्रमात भेटल्यानंतर कांबळी भावूक झाले होते, ज्याचा व्हीडिओही व्हायरल झाला होता. हेही वाचा – Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विनोद कांबळी यांचे आयुष्य फार चढउतारांनी वेढलेलं आहे. हल्लीच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, २०१३ मध्ये त्यांना एकाच वेळी दोन ह्रदयविकाराचे झटके आले होते. ज्याचा खर्च स्वत: सचिन तेंडुलकरने केला होता. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.