Which Player Replaced R Ashwin for Melbourne and Sydney IND vs AUS Test: भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मध्यातच निवृत्ती जाहीर करत मायदेशी परतला आहे. अश्विनच्या या धक्कादायक निर्णयाचा ऑस्ट्रेलियात असलेल्या टीम इंडियावर मोठा परिणाम झाला आहे. अश्विनने निवृत्ती घेतल्याने आता संघात २ फिरकीपटू आहेत, जडेजा आणि अश्विन. आता अश्विनच्या जागी मुंबई क्रिकेट संघाच्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू असलेल्या तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मेलबर्न आणि सिडनी कसोटीसाठी संघात सामील करण्यात येणार आहे. अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. तनुष कोटियन एक उत्कृष्ट ऑफस्पिनर आहे आणि त्याबरोबरच तो खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करतो. आज झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमधील हैदराबादविरूद्धच्या सामन्यात संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण ३९ धावांची खेळी केली. हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल तनुष कोटियन भारताच्या संघात बॅकअप म्हणून निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेलने वैयक्तिक कारण देत उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने तनुष कोटियनला संधी देण्यात आली. गाबा कसोटीनंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर निवडकर्त्यांना कोटियनचा समावेश करण्यास भाग पाडले आहे. गेल्या मोसमात रणजी करंडक विजेता आणि अहमदाबादमधील मुंबईच्या विजय हजारे करंडक संघाचा भाग असलेला २६ वर्षीय कोटियन मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ? NEWS ? Border-Gavaskar Trophy: Tanush Kotian added to India’s Test squad. #TeamIndia | #AUSvIND More Details ? हेही वाचा – Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय २६ वर्षीय तनुष कोटियनने आतापर्यंत ३३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तनुषच्या नावावर १०१ विकेट आहेत. मोठी गोष्ट म्हणजे त्याची प्रथम श्रेणीची सरासरी ४१ पेक्षा जास्त आहे. कोटियनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५२५ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर २ शतकं आणि १३ अर्धशतकं आहेत. कोटियान गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडूनही खेळला होता, त्याला या संघाने सलामीवीराची भूमिकाही दिली होती. हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर भारताने सुरूवातीच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या फिरकीपटूंना संधी दिली आहे. पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदर, अॅडलेड पिंक बॉल कसोटी आर अश्विनला आणि गाबा कसोटीत रवींद्र जडेजाला संधी दिली होती. आता मेलबर्न आणि सिडनी कसोटीत टीम इंडिया जडेजा आणि वॉशिंग्टन या दोन्ही फिरकीपटूंना संधी देऊ शकते, जेणेकरून संघाची फलंदाजी बाजूही भक्कम होईल आणि तेथील परिस्थितीसाठी दोन फिरकीपटूंनी खेळणही महत्त्वाचं असणार आहे. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.