Virendra Sehwag: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक अभिमान वाटावी अशी कामगिरी केली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या यादीत विजय सोरेंग नावाचे जवानही होता. यांच्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्यात आता वीरेंद्र सेहवागने मोठी भूमिका बजावली आहे आणि त्या मुलाची निवड आता हरियाणाच्या संघात जाली आहे. राहुल सोरेंग या क्रिकेटपटूची विजय मर्चंट ट्रॉफीसाठी हरियाणाच्या संघात निवड झाली आहे. वीरेंद्र सेहवागने स्वतः ट्विट करून चाहत्यांना याची माहिती दिली. वीरेंद्र सेहवागच्या मदतीने राहुल सोरेंग क्रिकेटपटू कसा बनला आणि सेहवागने या १५ वर्षांच्या मुलाचे आयुष्य कसे बदलले, याची कहाणीदेखील कमाल आहे. सेहवागने एक्सवर पोस्ट शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झाला. पुलवामा हल्ल्यामध्ये हरियाणा संघाचा राहुल सोरेंग याचे वडिलही शहीद झाले. त्यावेळी राहुल फक्त १० वर्षांचा होता. आता त्याचे भविष्य कसे असेल हे राहुलला माहित नव्हते पण सेहवागच्या एका वचनाने त्याचे आयुष्य बदलले. हेही वाचा – पुलवामा हल्ल्यानंतर वीरेंद्र सेहवागने CRPF हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. सेहवागने आपले वचन पाळले आणि राहुल सोरेंगला त्याच्या झज्जर येथील शाळेत प्रवेश दिला. राहुल सोरेंग सेहवाग इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे जिथे ते या खेळाडूला मोफत शिक्षण देत आहेत तसेच त्याला क्रिकेटपटू होण्याचेही धडे दिले जात आहेत. हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती राहुल सोरेंग आता १५ वर्षांचा असून त्याला विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये संधी मिळाली आहे. सेहवागचा मुलगाही या स्पर्धेत खेळला आहे, तो दिल्ली संघात आहे. हरियाणा संघात राहुल सोरेंगची निवड झाल्यावर सेहवागने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. हेही वाचा – VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘राहुल सोरेंग नाव लक्षात ठेवा. हा माझ्या जीवनातील खूप कमाल प्रसंग आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, मी शहिद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याबद्दल बोललो होतो आणि मला अभिमान वाटतो की २०२९ मध्ये शहीद विजय सोरेंग यांचा मुलगा सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झाला. जो गेल्या ४ वर्षांपासून आमच्याबरोबर आहे आणि आता त्याची हरियाणाच्या अंडर-१६ संघात विजय मर्चंट ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. ताही गोष्टी खूप आनंद देणाऱ्या असतात. आपल्या जवानांचे खूप खूप आभार. हेही वाचा – R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला Remember the Name- Rahul Soreng. This is one of the happiest feelings in life. After the tragic Pulwama attack, had made an appeal to offer free education to children of our martyr’s study and stay in my @sehwagschool . I feel so privileged that Rahul Soreng , son of Pulwama… pic.twitter.com/L0Qlc1hh3j राहुल सोरेंग हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि सेहवागप्रमाणेच तो सलामीवीर देखील आहे. हा खेळाडू त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये राहुल सोरेंग कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.