KRIDA

PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन

Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने लग्नगाठ बांधली आहे. सिंधूने रविवारी उदयपूरमध्ये हैदराबादस्थित आयटी कंपनीचे संचालक व्यंकट दत्ता साई यांच्याशी लग्नगाठ बांधली. उदयसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल रॅफल्समध्ये लग्नाचे सर्व विधी पार पडले. २३ डिसेंबर रोजी पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकले आहेत. क्रीडा आणि राजकारणातील काही सेलिब्रिटीही या लग्नाचे साक्षीदार होते. पण पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई नेमका आहे कोण, जाणून घ्या. सिंधूचे पती व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक आहेत. पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकिय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव यांचे चिरंजीव आहेत. फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन (FLAME) विद्यापीठातून त्यांनी लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी याच संस्थेतून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए देखील मिळवले. हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर क व्यंकट दत्ता साई यांच्या व्यावसायिक प्रवासात JSW मधील कार्यकाळाचा समावेश आहे, जिथे त्यांनी संस्थेच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन केले. २०१९ मध्ये पोसिडेक्समध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी Sour Apple Asset Management चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज पीव्ही सिंधूच्या वडिलांनी सांगितले होते की, दोन्ही कुटुंब एकमेकांना आधीच ओळखत होते, पण नोव्हेंबरमध्ये सर्व काही ठरलं होतं. सिंधूच्या वडिलांनी पीटीआयला सांगितले होते की तिचे जानेवारीपासूनचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे, त्यामुळे हीच योग्य वेळ होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी २२ डिसेंबरला लग्न समारंभ करण्याचे ठरवले. यापूर्वी दोघांनी १४ डिसेंबरला साखरपुडा केला होता. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.