Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Shocking Video: विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्याची पत्नी अनुष्का शर्माही त्याच्याबरोबरच तिथे आहे. विराटने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून फॉर्मात आल्याचे संकेत दिले होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढेच नाही तर काही लोक त्याला निवृत्तीचा सल्लाही देत आहेत. पण याचदरम्यान विराटचं क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा एक किस्सा बॉलीवूड अभिनेता वरूण धवन याने सांगितला आहे. वरुण धवन यूट्यूब कंटेंट क्रिएटर रणवीर अलहबादियाच्या पोडकास्टमध्ये पोहोचला होता. यादरम्यान बोलताना अनुष्का शर्माचे त्याने कौतुक केले आणि विराट कोहलीच्या यशात तिची किती महत्त्वाची भूमिका आहे, हेही सांगितले. धवनने २०१८ मधील नॉटिंगहॅम कसोटीमधील घटना सांगितली, जेव्हा विराट कोहली रडत होता आणि संघाचा कर्णधारही होता. हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती धवनने सांगितले की, जेव्हा तो अनुष्काबरोबर सुई-धागा चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा विराट कोहलीबद्दल चर्चा झाली होती. २०१८ च्या त्या कसोटी मालिकेतील पराभवासाठी विराटने स्वत:ला जबाबदार ठरवलं होतं आणि नेमकं तेव्हा काय घडलं होतं हे तिने वरूण धवनबरोबर शेअर केलं होतं. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यादरम्यान वरूण धवनने अनुष्का शर्माने शेअर केलेला किस्सा सांगताना म्हणाला, विराट म्हणजे त्याने खूप काही सहन केलं आहे. जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हा अनुष्काने त्याच्या मानसिक स्थितीबद्दल माझ्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या होत्या. हेही वाचा – R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला पुढे सांगताना वरूण म्हणाला, कदाचित ती नॉटिंगहम कसोटी होती. जिथे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यादिवशी अनुष्का तो सामना पाहायला गेली नव्हती. पण जेव्हा त्या सामन्यानंतर परत आली तेव्हा तिला माहित नव्हतं की विराट कोहली नेमका कुठे आहे. जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा तो खूपच खचला होता आणि विराट रडत होता. विराटला तेव्हा वाटतं होतं की तो अपयशी ठरल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण विराटच सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो संघाचा कर्णधारही होता. हेही वाचा – R Ashwin Retirement: “जर विराट कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती…”, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य A post shared by The Ranveer Show (@theranveershowpodcast) विराट कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यावरील त्या नॉटिंगहम कसोटीत १४९ आणि ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. पण इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढे भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यादरम्यान विराट कोहलीच्या खांद्यावर संघाची धुरा होती. None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
- By Sarkai Info
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.